सिल्व्हर ओकवर हल्ला करण्यास सदावर्तेंनीच कर्मचाऱ्यांना भडकवल; राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

मुंबई – संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी आंदोलन केले. यावेळी कर्मचाऱ्यांनी चप्पला फेकल्या. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलिसांची मोठी तारांबळ उडाली. या हल्ल्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ऍड. गुणरत्न सदावर्ते यांना जबाबदार धरलं आहे. सदावर्ते हे एसटी कर्मचाऱ्यांचे वकील आहेत.
सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी सिल्व्हर ओकला दाखल झाले. संतप्त एसटी कर्मचारी शरद पवारांच्या निवासस्थानी सरकारविरोधात घोषणाबाजी करत होते. शरद पवार, अजित पवार यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. एसटी विलिनीकरणासाठी ११७ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याचे म्हणत आंदोलकांनी सिल्व्हर ओकलवर घोषणाबाजी केली.
दरम्यान आंदोलनाची माहिती मिळातच राष्ट्रवादीचे मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे कार्यकर्त सिल्व्हर ओकवर दाखल झाले. नरेंद्र राणे म्हणाले की, गुणरत्न सदावर्ते यांनीच कर्मचाऱ्यांना भडकावून शरद पवारांच्या घरी हल्ला करण्यास सांगितले. अनेक कर्मचारी दारू पिऊन याठिकाणी आले होते. सदावर्तेंना आम्ही सोडणार नाही. हिंमत असेल तर त्यांनी येऊन दाखवावं असं आव्हान त्यांनी दिलं..
आझाद मैदानावर संप चालू होता. सरकारशी बोलणी सुरू होती. कोर्टात प्रकरण आहे. कर्मचाऱ्यांना बोलण्याची संधी दिली होती. मात्र याप्रकारचा हल्ला खपवून घेणार नाही असा इशारा त्यांनी दिला.





