Maharashtra Politics : शरद पवारांना ‘या’ केंद्रीय मंत्र्याकडून मोठी ऑफर; राजकीय वर्तुळात चर्चा
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण (Maharashtra Politics) होणार असल्याच्या चर्चेने गेल्या काही दिवसांत देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली होती.

Maharashtra Politics : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण (Maharashtra Politics) होणार असल्याच्या चर्चेने गेल्या काही दिवसांत देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली होती.
शिवसेना नेते संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी समविचारी पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावे, अशी भूमिका मांडली होती.या संपूर्ण घडामोडींवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अत्यंत सावध पवित्रा घेतला असतानाच, आता या वादात (Maharashtra Politics) एक धक्कादायक आणि नवी राजकीय ऑफर समोर आली आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शरद पवार यांना काँग्रेसमध्ये जाण्याऐवजी थेट भाजप किंवा महायुतीसोबत येण्याचे खुले निमंत्रण दिले आहे. सांगलीत पत्रकारांशी बोलताना आठवले यांनी टाकलेल्या या गुगलीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या समीकरणांच्या चर्चांना उधाण आले आहे.
सांगलीतील पत्रकार परिषदेत बोलताना रामदास आठवले यांनी शरद पवारांना सल्ला दिला की, त्यांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याची चूक करू नये. काही दिवसांपूर्वी आठवलेंनी स्वतः पवारांना काँग्रेसमध्ये जाण्याचा सल्ला दिला होता, परंतु आता त्यांनी आपल्या भूमिकेत मोठा बदल केला आहे.
काँग्रेसवर सडकून टीका करताना आठवले म्हणाले की, आताच्या काँग्रेसमध्ये पूर्वीसारखा दम राहिलेला नाही आणि नजीकच्या काळात काँग्रेसला चांगले भविष्य दिसेल अशी कोणतीही परिस्थिती सध्यातरी नाही. त्यामुळे पवारांनी तिथे जाण्याऐवजी आमच्यासोबत यावे.
जर शरद पवारांना थेट भारतीय जनता पक्षात जाणे संकोचाचे वाटत असेल किंवा काही अडचण असेल, तर त्यांनी माझ्या ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ (RPI) मध्ये प्रवेश करावा; आम्ही त्यांना सन्मानाने भाजपसोबत घेऊन जाऊ, असे सूचक आणि मिश्किल विधानही त्यांनी केले. या अनोख्या प्रस्तावावर (Maharashtra Politics) पवार गटाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली, तरी या विधानाने राजकीय वातावरण नक्कीच तापवले आहे.
या पत्रकार परिषदेत आठवले यांनी देशातील इतरही अनेक चालू घडामोडींवर आपली रोखठोक मते मांडली. देशातील महागाईवर बोलताना त्यांनी मान्य केले की, पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाल्यामुळे महागाई वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
सरकारकडून सध्या गरिबांना मोफत धान्य दिले जात असले, तरी यात सरकारला कोणताही आनंद नाही, उलट भविष्यात या लाभार्थ्यांची संख्या कमी होऊन लोक स्वावलंबी व्हावेत, अशीच आमची प्रामाणिक भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय, देशात गाजत असलेल्या पेपरफुटीच्या मुद्द्यावरून त्यांनी विरोधकांवर, विशेषतः काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. पेपरफुटीचा विषय सोडवण्यासाठी काँग्रेसची गरज नसून त्यासाठी भारतीय जनता पार्टी सक्षम आहे, असे सांगत त्यांनी अमेरिकेतून येऊन मोर्चे काढण्यापेक्षा किंवा राजीनामे मागण्यापेक्षा विरोधकांनी सरकारला योग्य त्या सूचना कराव्यात, असा टोला लगावला. तसेच या प्रकरणात जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
काँग्रेसच्या ‘मोदी हटाव’ या राजकीय मोहिमेची थट्टा उडवताना रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत सांगितले की, काँग्रेसचे व्हिजन जरी मोदींना सत्तेवरून हटवण्याचे असले, तरी जोपर्यंत रामदास आठवले मोदींच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, तोपर्यंत मोदींना पदावरून कोणीही हटवू शकत नाही.
शेवटच्या टप्प्यात त्यांनी काँग्रेसच्या भूतकाळातील कारभारावर टीका करताना सांगितले की, काँग्रेसने देशावर जे काही राजकीय आणि आर्थिक कर्ज करून ठेवले आहे, ते फेडण्याची वेळ आता आमच्यावर आली आहे. हे कर्ज फेडण्याची संपूर्ण जबाबदारी आमच्या सरकारने घेतली असून, ते फेडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.
रामदास आठवलेंच्या या चौफेर टोलेबाजीमुळे आणि शरद पवारांना (Maharashtra Politics) दिलेल्या थेट ऑफरमुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणती नवीन कलाटणी मिळते, याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.






