Satara | हुतात्म्यांचे बलिदान भावी पिढ्यांना स्फूर्तिदायक

पुसेसावळी, (प्रतिनिधी) – देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान देणार्या हुतात्म्यांच्या स्मृती भावी पिढ्यांना स्फूर्तिदायक ठराव्यात, या उद्देशाने पुसेसावळी परिसरात हुतात्मा स्मारके उभारण्यात आली आहेत.
स्वातंत्र्यसंग्रामात पुसेसावळी भागातील शेकडो स्वातंत्र्यसैनिक सहभागी झाले होते. त्यातील अनेक हुतात्मा झाले होते.त्यांच्या स्मृती कायम ठेवून, त्यांचा आदर्श घ्यावा, असे मत भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी व्यक्त केले.
वडगाव (ज. स्वा.), ता. खटाव येथील हुतात्मा स्मारकात सोमवारी झालेल्या अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, नायब तहसीलदार महेश गायकवाड, समाजकल्याण समितीचे माजी सभापती शिवाजीराव सर्वगोड, बाजार समितीचे संचालक महेश घार्गे, सोसायटीचे चेअरमन नानासाहेब घार्गे, माजी व्हाइस चेअरमन दादासाहेब घार्गे यांनी हुतात्म्यांच्या प्रतिमांना पुष्पचके्र अर्पण करून, अभिवादन केले.
विकास सेवा सोसायटी संचालक सचिन सुतार, अनिल घार्गे, संदीप भोसले, प्रकाश सोरटे, दादासाहेब कोकाटे, अरविंद घार्गे, ग्रामपंचायत सदस्य दिगंबर उबाळे, हरिभाऊ बाळे, मधुकर घार्गे, अधिक घार्गे, जालिंदर उबाळे, बशीर मुलाणी, ग्रामस्थ, हुतात्म्यांचे वारसदार व नातेवाईक उपस्थित होते.





