सचिन वाघमारे यांची डोंगरगावच्या उपसरपंचपदी निवड
Updated On:

वाघोली (प्रतिनिधी) : डोंगरगाव तालुका हवेली येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सचिन वाघमारे यांची निवड झाली असून त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्र राज्याचे भाजप युवा मोर्चा नेते गणेश कुटे यांच्या हस्ते निवडीबद्दल वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्रशांत गायकवाड, खंडेराव गायकवाड, विठ्ठल गायकवाड, विशाल कुटे, अविनाश कुटे, तुषार कुटे,अजित कुटे,राहुल कुटे आदी मान्यवर उपस्थित होते.





