चांदखेड – चांदखेड ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी विद्यमान सदस्य दादाभाऊ सुदाम केदारी यांची बिनविरोध निवड झाली. माजी उपसरपंच प्रियांका ओंकार गायकवाड यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांच्या राजीनाम्यानंतर ही निवड प्रक्रिया पार पडली. उपसरपंच पदासाठी झालेल्या बैठकीत सर्व सदस्यांच्या एकमताने दादाभाऊ केदारी यांची निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे स्वागत ग्रामपंचायतीत तसेच गावकऱ्यांमध्ये आनंदाने करण्यात आले. निवडीनंतर नवनिर्वाचित उपसरपंचांचा सत्कार त्यांच्या निवासस्थानी करण्यात आला. या वेळी पै. रमेश गायकवाड, माजी उपसरपंच पौरस बारमुख, माजी ग्रामसदस्य दत्ता घोलप, मयूर कदम आदी मान्यवर उपस्थित होते.