डोंगरगावच्या युवकाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडून कौतुक

वाघोली – वाढदिवसाचा अनावशयक खर्च टाळून परंडा येथील अतिवृष्टीने ग्रस्त असलेल्या नागरिकांना मदत केल्याबद्दल धाराशिव चे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी डोंगरगाव तालुका हवेली येथील युवा उद्योजक मयूर गायकवाड यांचे कौतुक केले आहे.
डोंगरगाव तालुका हवेली येथील उद्योजक मयूर गायकवाड यांनी वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून आपल्या मित्र परिवाराला आणि डोंगरगाव ग्रामस्थांना अतिवृष्टीमुळे जीवन विस्कळीत झालेल्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले होते.
त्यांच्या मित्र परिवाराने आणि डोंगरगाव ग्रामस्थांनी चांगल्या प्रतीने प्रतिसाद देऊन दहा किलो प्रति वजनाचे 400 किराणा मालाचे किट म्हणजेच चार टन किराणामाल त्यांनी धाराशिव मध्ये परंडा या ठिकाणी वाटप केला.
वाघोली गावचे समाजसेवक संपत आबा गाडे यांनी रोख पन्नास हजार रुपये या कामासाठी दिले होते त्यातून जवळजवळ 100 किट उभारण्यासाठी मदत झाल्याचे गायकवाड यांनी सांगितले. धाराशिव चे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मयूर गायकवाड आणि डोंगरगाव ग्रामस्थांचे या उपक्रमाबद्दल कौतुक केले.





