Mothers Day 2025 : सचिन-विराटसह रोहित शर्माने खास पोस्ट करत आईच्या ममतेला केला सलाम

Mothers Day 2025 Sachin Tendulkar and Virat Kohli Post : आज संपूर्ण देशभरात मातृदिन साजरा केला जात आहे. सामान्य नागरिकांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत, प्रत्येकजण आपल्या आईबद्दल भावना व्यक्त करत आहेत. त्याचबरोबर आईच्या त्यागाचे आणि योगदानाचे स्मरण करत आहे. यामध्ये सचिन तेंडुलकर, विराच कोहली आणि रोहित शर्मा सारख्या स्टार खेळाडूंचा समावेश आहे. ज्यांनी आपल्या आईसाठी खास पोस्ट शेअर केल्या आहेत.
माझी आई नेहमीच माझ्यासाठी आधारस्तंभ – सचिन तेंडुलकर
भारतीय संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने त्याच्या एक्स अकाऊंटवर कुटुंबाचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये सचिनसोबत त्याची आई आणि इतर भावंडे दिसत आहेत. या फोटोला सुंदर कॅप्शन देताना सचिनने लिहिले, ‘मी जे काही करतो. ते तिच्या प्रार्थनेने आणि तिच्या शक्तीने सुरू होते. माझी आई नेहमीच माझ्यासाठी आधारस्तंभ राहिली आहे, जशी प्रत्येक आई तिच्या मुलासाठी असते. त्यामुळे सर्व अविश्वसनीय मातांना मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!’
Everything I am started with her prayers and her strength. My Aai has always been my anchor, just like every mother is for her child.
Wishing all the incredible mothers a very Happy Mother’s Day!
#MothersDay pic.twitter.com/AUSnZC7G6L— Sachin Tendulkar (@sachin_rt) May 11, 2025
रोहित शर्माची इन्स्टा स्टोरी –
Rohit Sharma celebrates the strength and love of the women in his life this Mother’s Day ❤️#RohitSharma #MothersDay #InsideSport pic.twitter.com/VhFFnoFVQF
— InsideSport (@InsideSportIND) May 11, 2025
भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज रोहित शर्मानेही त्याच्या आईसाठी इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये त्याने त्याच्या मुलांच्या आईचा म्हणजेच त्याच्या पत्नीचा फोटोही शेअर केला आहे. त्याने लिहिले, ‘मातृदिनाच्या शुभेच्छा.’
हेही वाचा – IPL 2025 : आयपीएल पुन्हा सुरु होण्याची तारीख ठरली! ‘या’ तारखेला रंगणार फायनलचा थरार
विराट कोहलीने आईसाठी शेअर केली इन्स्टा स्टोरी –
View this post on Instagram
विराट कोहलीने इंस्टाग्रामवर ३ फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये पहिला फोटो अनुष्का आणि त्याच्या मुलांचा आहे. दुसऱ्या फोटोत विराट आपल्या आईसोबत आहे. तिसऱ्या फोटोत अनुष्का तिच्या आईसोबत दिसत आहे. यासोबतच त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘जगातील सर्व मातांना मातृदिनाच्या शुभेच्छा. मी एका आईच्या पोटी जन्मलो, एका आईने मला मुलगा म्हणून स्वीकारले आणि एका आईला आपल्या मुलांसाठी एक मजबूत, संगोपन करणारी, प्रेमळ आणि संरक्षण देणारी आई म्हणून वाढताना पाहिले आहे. आम्ही तुझ्यावर नेहमी प्रेम करतो. या पोस्टमध्ये त्याने पत्नी अनुष्काला मेन्शन केले आहे.





