Sachin Tendulkar Statement : “अपयश चालेल, पण चीटिंग नाही…!”, विद्यार्थ्यांच्या दिल्लीतील आंदोलनावर सचिन तेंडुलकरचं मोठं वक्तव्य
Sachin Tendulkar Statement ; महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने विद्यार्थ्य्याच्या दिल्लीतील थेट भूमिका मांडली आहे.

Sachin Tendulkar Statement On Education Reform Students Protest NEET Controversy : दिल्लीत ‘कॉकरोच जनता पार्टी’ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय प्रवेश परीक्षा (NEET) प्रकरणावरून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावर आता महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) थेट भूमिका मांडली आहे. आंदोलनाला हिंसक वळण लागून पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या चकमकीनंतर, सचिनने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर (X) पोस्ट शेअर करत गुणवत्तेवर आधारित पारदर्शक शिक्षण व्यवस्थेची जोरदार मागणी केली आहे.
“अपयश चालेल, पण चीटिंग नाही!” – सचिनची वडिलांची शिकवण
आपल्या प्रोफेसर वडिलांच्या शिकवणीची आठवण करून देत सचिन म्हणाला, “माझे वडील अनेक विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक होते. त्यांनी मला लहानपणापासून एक महत्त्वाचा धडा शिकवला – ‘अपयशी होणे ठीक आहे, पण चीटिंग किंवा शॉर्टकट कधीही स्वीकारू नका.’ आज जेव्हा विद्यार्थ्यांना वाटते की त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले नाही, तेव्हा त्यांची निराशा समजण्यासारखी आहे. जे समाज प्रयत्नांपेक्षा थेट निकालांना प्राधान्य देतात, तिथे गुणवत्तेऐवजी शॉर्टकट शोधले जातात.”
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी –
— Sachin Tendulkar (@sachin_rt) July 23, 2026
जंतर-मंतरवर गेल्या २० जूनपासून विद्यार्थी नीट (NEET) परीक्षेतील गैरप्रकार आणि पेपर फुटीविरोधात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. या हिंसक आंदोलनावर यापूर्वी शिखर धवननेही विद्यार्थ्यांना धीर धरण्याचे आवाहन केले होते.
तरुणांचा विश्वास टिकवणे समाजाची जबाबदारी –
सचिनने पुढे नमूद केले की, “शिक्षक, पालक आणि प्रशासकांनी एकत्र येऊन अशी संस्कृती तयार केली पाहिजे, जिथे प्रामाणिकपणाला वाव मिळेल आणि गुणवत्तेचा (Merit) विजय होईल. विद्यार्थ्यांची मेहनत वाया जाणार नाही, असा सुरक्षित आणि उज्ज्वल भविष्याचा विश्वास त्यांना देणे ही संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे.”





