हेही वाचा – Sanju Samson : संजू सॅमसनचा कहर! पाच दिवसात साकारली तिसरी वादळी खेळी, सूर्या-गंभीरची वाढली डोकेदुखी
\nगणेशोत्सवाच्या निमित्ताने ठाकरे बंधूंमधील पुनर्मिलन –
\nगणेशोत्सवाच्या निमित्ताने ठाकरे बंधूंमधील पुनर्मिलनही चर्चेचा विषय ठरला. २० वर्षांनंतर शिवसेना-यूबीटी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या कुटुंबासह राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट देऊन पूजा केली. गेल्या तीन महिन्यांत ठाकरे बंधू तिसऱ्यांदा एकत्र दिसले. यापूर्वी ५ जुलै रोजी विजय रॅलीत आणि २७ जुलै रोजी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे ‘मातोश्री’ येथे गेले होते.
\n‘शिवतीर्थ’ येथील गणेशोत्सव राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांच्या भेटींमुळे चर्चेत आहे. सचिन तेंडुलकर यांच्या दर्शनाने या उत्सवाला आणखी विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.