Sachin Sanghvi : लग्नाचं आमिष दाखवून गैरफायदा घेतला, बळजबरीनं गर्भापात…; बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक ‘सचिन संघवी’ला अटक

Bollywood singer Sachin Sanghvi : बॉलिवूडमधील लोकप्रिय संगीतकार जोडी सचिन-जिगर यांच्यापैकी संगीतकार सचिन संघवीला एका १९ वर्षीय तरुणीच्या तक्रारीनंतर अटक करण्यात आली आहे. तरुणीने केलेल्या तक्रारीनुसार, सचिन संघवीवर बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप लावण्यात आले होते. त्यामुळे विलेपार्ले पोलिसांनी सचिनला बेड्या ठोकल्या आहेत. मात्र त्याला नंतर जामीन मिळाला आहे.
तक्रारीनुसार, पोलिसांनी सचिनवर फसवणूक, अत्याचार आणि महिलेची संमती नसताना गर्भपात घडवून आणल्याचे गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सांताक्रूझ पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे. फिर्यादी तरुणी विलेपार्ले (पूर्व) येथे राहते आणि व्यावसायिक गायिका आहे. तिची आणि सचिन संघवी यांची ओळख फेब्रुवारी २०२४ मध्ये इंस्टाग्रामवर झाली.
सचिनने तिच्या गायकीचे कौतुक करून तिला आपल्या अल्बममध्ये कामाची ऑफर दिली. यानंतर दोघांमध्ये संपर्क वाढला आणि ते वारंवार भेटू लागले. तरुणीने आरोप केला आहे की, सचिनने तिच्यावर विश्वास संपादन करत पत्नीला घटस्फोट देऊन लग्न करेल, असे आश्वासन दिले.
एप्रिल २०२४ मध्ये सांताक्रूझ येथील स्टुडिओमध्ये आणि त्यानंतर मे-जून महिन्यात सचिनच्या घरी तसेच बुडापेस्टमध्ये त्याने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. २९ जुलै २०२५ रोजी पीडितेला सचिनच्या फोनमध्ये इतर महिलांसोबतचे फोटो आणि चॅट्स आढळल्याने दोघांमध्ये वाद झाला. यानंतर दुबईत असताना त्याने तिच्या इच्छेविरुद्ध संबंध ठेवले, असा आरोप तिने केला आहे.
View this post on Instagram
४ ऑगस्ट २०२५ रोजी तरुणीला कळले की ती गरोदर आहे. त्यावेळी सचिनने तिचे फोटो आणि व्हिडिओ लीक करण्याची धमकी देत गर्भपात करण्यास भाग पाडले. भीतीमुळे तिने गर्भपात केला, त्यानंतर सचिनने तिच्याशी सर्व संबंध तोडले, असे तिने तक्रारीत म्हटले आहे.
या घटनेमुळे पीडितेवर मानसिक ताण आला असून, अखेर तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. पोलीस तपासानंतर सचिन संघवीला अटक करण्यात आली. मात्र, अटकेनंतर काही तासांतच सचिनला जामिनावर सोडण्यात आलं. सचिन संघवी हा मूळचा गुजरातमधील असून, त्यानं अनेक सुपरहिट हिंदी चित्रपटांसाठी संगीत दिलं आहे.
दरम्यान, सचिन संघवीच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, सचिन संघवी हा मुळचा गुजरातचा असून सध्या तो महाराष्ट्रात वास्तव्यास आहे. आतापर्यंत सचिननं एआर रहमान, अमित त्रिवेदी, अनु मलिक, नदीम श्रवण, संदेश शांडिल्य यांसारख्या नावाजलेल्या संगीतकारांसोबत काम केलंय.
तसेच, अनेक सुपरहिट गाणीही इंडस्ट्रीला दिलीत. सचिन संघवीनं बॉलिवूडच्या ‘जयंती भाई की लव्ह स्टोरी’, ‘हिम्मतवाला’, ‘ओह माय गॉड’, ‘तेरे नाल लव हो गया’, ‘क्या सुपर कूल है हम’, ‘अजब गजब लव’, ‘एबीसीडी’, ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘मी और मै’, ‘गो गोवा गॉन’, ‘रमैया वस्तावया’ यांसारख्या सुपरहिट सिनेमांतल्या गाण्यांना संगीत दिलं आहे.





