सचिन खेडेकर यांच्या सोशल मीडियावरील त्या फोटोने सर्वांचे वेधले लक्ष

प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर नेहमीच आपल्या चित्रपटातील पात्रामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. सोशल मीडियावर सचिन खेडेकर सक्रिय असून आपल्या लाईफच्या अपडेटने चाहत्यांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असतात.
View this post on Instagram
नुकतेच त्यांच्या लग्नाला ३० वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने सचिन खेडेकर यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केला. या फोटोमुळे पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहे. या फोटोत ते पत्नी जल्पा खेडेकरसोबत दिसत आहे. या फोटोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय.
दोघंही एका रेस्टॉरंटमध्ये असून त्यांच्या तोंडात सिग्रेट आहे. दोघांनी तोंडातील सिग्रेट एकमेकांच्या सिग्रेटला लावली आहे. त्यांच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट करत त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सचिन खेडेकर लिहितात,’जल्पा, माझ्या जीवनाचा प्रकाश. तुला ३० व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम्हाला एखादी व्यक्ती तिच्या सर्व गुणांमुळे आवडते आणि काही गुणांमुळे तुमचं त्या व्यक्तीवर प्रेम असतं. हीच परफेक्ट रेसिपी आहे.’ असं लिहत त्यांनी पोस्ट शेअर केली आहे.
सोशल मीडियावर या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. कलाविश्वातून आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सचिन यांनी 19 डिसेंबर 1993 साली लग्नगाठ बांधली. त्यांनी अनेक मालिका, नाटक, सिनेमांमध्ये काम केलं. ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या सिनेमाने तर त्यांना प्रचंड लोकप्रियता दिली.





