सचिन खेडेकरांचे तब्बल 21 वर्षांनी रंगभूमीवर कमबॅक

Sachin Khedekar | अभिनेते सचिन खेडेकर यांनी मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. यानंतर आता ते तब्बल 21 वर्षांनी पुन्हा मराठी व्यावसायिक रंगभूमीवर परतले आहेत. ते व्यावसायिक नाटकात काम करताना दिसणार आहेत.
सचिन खेडेकर यांनी आजवर दमदार अभिनयकौशल्याच्या जोरावर मराठीत चित्रपट, मालिका, नाटक या तीनही माध्यमांत आपला ठसा उमटवला आहे. तसंच हिंदी, तेलुगू, गुजराती, तमिळ, मल्याळम चित्रपट तसेच वेब सीरिजमध्येही त्यांच्या अनेक भूमिका केल्या आहेत. आता एका वेगळ्या भूमिकेत ते प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.
‘गेट वेल सुन’, ‘हॅम्लेट’, ‘हसवा फसवी’, ‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’, ‘युगांत’, ‘संज्या छाया’, ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’, ‘चारचौघी’, ‘आज्जी बाई जोरात’ अशा अनेक दर्जेदार नाटकांद्वारे मराठी रंगभूमी गाजवणाऱ्या जिगिषा आणि अष्टविनायक या निर्मिती संस्था आता पुन्हा एकदा नवीन नाटकासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. Sachin Khedekar |
“आयुष्यात प्रत्येकाच्या वाट्याला एक ‘भूमिका’ येते. ती जगण्यासाठी तुम्ही प्रत्येक वेळी कलावंत असण्याची गरज नसते.” असे म्हणत जिगिषा आणि अष्टविनायक आपल्या आगामी नाटकाची घोषणा करत आहेत. ‘भूमिका’ असे या नाटकाचे नाव असून यात सचिन खेडेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या नाटकाचे दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णी करणार आहेत. Sachin Khedekar |
दरम्यान, सचिन ‘जुनं फर्निचर’ आणि ‘ए वतन मेरे वतन’ या सिनेमातून अखेरचे प्रेक्षकांच्या भेटीस आले. त्यानंतर आता त्यांच्या या आगामी प्रोजेक्टविषयी त्यांचे चाहतेही खूप उत्सुक आहेत. ‘भूमिका’ या नाटकात ते नेमकी कोणती व्यक्तिरेखा साकारणार आहेत याबद्दल उत्सुकता आहे. याच महिन्यात हे नाटक रंगभूमीवर येणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे.
हेही वाचा:





