Sachin Ahir : सचिन अहिर विधानपरिषदेचे नवे उपसभापती! ठाकरेंनी उमेदवारी मागे घेतल्याने बिनविरोध निवड
Sachin Ahir : एकमताने विधान परिषदेच्या उपसभापती नियुक्ती

Sachin Ahir : मागील आठवड्यात ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत ठाकरेंच्या 6 खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आठ दिवसांत उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दुसरा मोठा धक्का दिला.
उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे आमदार सचिन अहिर यांना शिवसेनेकडून विधानपरिषदेच्या उपसभापती पदाची उमेदवारी दिली. त्यानंतर अखेर आज सचिन अहिर यांची बिनविरोध उपसभापती म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीसभागृहात सचिन अहिर यांचे अभिनंदन केले.
एकमताने विधान परिषदेच्या उपसभापती नियुक्ती
दरम्यान, विधान परिषदेतील उपसभापती पदासाठीच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे सचिन अहिर आणि महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे जगन्नाथ अभ्यंकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. विधान परिषदेतील आकडेवारी पाहता महायुतीचे एकतर्फी विजय होणार होता.
तरीही मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांना दाखल केलेला उमेदवारी अर्जाचा प्रस्ताव मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी सभागृहाची इच्छा लक्षात घेऊन उमेदवारीचा प्रस्ताव मागे घेत असल्याची घोषणा केली. त्यानंतर सचिन अहिर यांची एकमताने विधान परिषदेच्या उपसभापती नियुक्ती करण्यात आली आहे.
बातमी अपडेट होत आहे…





