Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरने व्यक्त केला आनंद; ‘त्या’ एका कारणासाठी मानले माधुरी दीक्षितचे आभार
Amruta Khanvilkar: 'आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी हा आनंदाचा क्षण'

Amruta Khanvilkar: मनोरंजन विश्वातील अनेक अभिनेत्री सध्या बिझनेस व्हयूमन म्हणून विविध क्षेत्रात यश मिळवत आहे. मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकरने देखील ‘अमूल्य बाय अमृता’ हा साड्यांचा ब्रँड लॉन्च केलाय.
विशेष म्हणजे अभिनेत्री माधुरी दीक्षितने ‘कोण होणार करोडपती’ या मराठी शोमध्ये अमृताच्या ब्रँडची साडी नेसली होती. याबाबत अमृताने एक व्हिडिओ शेअर आनंद व्यक्त केला आहे. तसेच माधुरीचे आभार व्यक्त केले आहेत.
अबोली रंगाची नऊवारी साडी, गळ्यात हार, केसात माळलेली गुलाबाची फुलं या मराठमोळ्या लूकमध्ये माधुरी खूपच सुंदर दिसत होती. आता माधुरीचा हा लूक पाहून अमृताने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
‘एक मोठं स्वप्न पूर्ण झालं’
अमृता म्हणाली, “यंदाची दिवाळी आमच्यासाठी खूप खास ठरलीये कारण, यावर्षी माझा साडी ब्रँड ‘अमूल्य बाय अमृता’चा जन्म झाला. ८ नोव्हेंबरला माझ्या साडी ब्रँडला ८ महिने पूर्ण झाले आहेत. यानिमित्ताने माझं एक मोठं स्वप्न पूर्ण झालं आहे.
हे माझ्यासाठी खऱ्या अर्थाने स्वप्नच आहे कारण आपल्या सगळ्यांच्या लाडक्या माधुरी दीक्षित-नेने मॅम यांनी ‘कोण होणार करोडपती’ या शोमध्ये दिवाळी विशेष भागात आमच्या ‘अमूल्य बाय अमृता’ ब्रँडची ‘जिजामाता नऊवारी’ साडी नेसण्यासाठी निवडली.”
View this post on Instagram
“मी लहानपणापासून त्यांची फॅन आहे, ज्यांच्या नृत्याची-सौंदर्याची भुरळ संपूर्ण जगाला पडलीये आणि आज त्यांनी माझ्या ब्रँडची साडी नेसणं याचा आनंद मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. आज माधुरी मॅमचे फोटो शेअर करताना सुद्धा मी काही क्षण थांबले. कारण या गोष्टी आपला स्वत:वरचा विश्वास वाढवतात. आज तसाच आनंद मला जाणवतोय. मी माधुरी मॅम आणि त्यांच्या संपूर्ण स्टायलिंग टीमचे आभार मानते.
माधुरी मॅम यंदा तुमच्यामुळे आमची दिवाळी खऱ्या अर्थाने अमूल्य झाली आहे. माझ्यासाठी, माझ्या आईसाठी आणि आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी हा आनंदाचा क्षण आहे,” अशा भावना अमृताने व्यक्त केल्या आहेत. अमृताच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी तिचे कौतुक करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा:





