SA W vs ENG W South Africa Reach Final : महिला वनडे विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा १२५ धावांनी पराभव करत पहिल्यांदाच अंतिम फेरीत स्थान मिळवले. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने ५० षटकांत ७ बाद ३१९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडचा संपूर्ण संघ ४२.३ षटकांत १९४ धावांवर गारद झाला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच अंतिम फेरीत गाठली. वोल्वार्ड्टची नाबाद शतकी खेळी; संघाला संकटातून काढले बाहेर इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली; परंतु हा निर्णय पूर्णतः चुकीचा ठरला. दक्षिण आफ्रिकेची सलामीवीर लॉरा वोल्वार्ड्टने एका टोकाला ठाण मांडत १४३ चेंडूंमध्ये २० चौकार व ४ षटकारांसह १६९ धावांची खणखणीत खेळी साकारली. तिच्यासह तास्मिन ब्रिट्सने पहिल्या गड्यासाठी ११६ धावांची भागीदारी रचली. ब्रिट्सने ४५ धावा फटकावल्या. पहिली विकेट पडल्यानंतर दक्षिण आफ्रिकेची अवस्था २०२ धावांवर ६ गडी बाद अशी संकटमय झाली. तेथून वोल्वार्ड्टने संयमाने खेळत संघाला ३१९ पर्यंत नेले. ती ४८व्या षटकात बाद झाली. इंग्लंडकडून सोफी एक्लेस्टोनने १० षटकांत ४४ धावा देत ४ विकेट्स घेतल्या, तर लॉरेन बेलने २ विकेट्स घेतल्या. हेही वाचा – Australian Cricketer Ventilator : धक्कादायक! क्रिकेट विश्वात मोठी दुर्घटना, चेंडू लागल्याने १७ वर्षीय खेळाडू गंभीर जखमी इंग्लंडची खराब सुरुवात; कॅप्प्सीच्या पंचकने फिरला सामना – ३२० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला सुरुवातीपासूनच दडपण जाणवले. अव्वल तीन फलंदाज शून्यावर तंबूत परतले, तर दोन फलंदाज शून्यावर व एक फलंदाज एकावर बाद झाला. चौथ्या गड्यासाठी नॅट सिव्हर-ब्रंट व अॅलिस कॅप्सी यांनी १०७ धावांची भागीदारी रचत आपल्या संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. हेही वाचा – Rohit Sharma : हिटमॅनने वयाच्या ३८व्या वर्षी रचला इतिहास! वनडे क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच केली अशी कामगिरी कॅप्सीने ५०, तर सिव्हर-ब्रंटने ६४ धावा केल्या. मात्र, या दोघींच्या विकेट्स पडल्यानंतर इंग्लंडची अवस्था बिकट झाली. दक्षिण आफ्रिकेकडून मरिझाने कॅप्पने ५ गडी बाद करत सामन्यात कमाल केली. दुसरी उपांत्य फेरी भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात ३० ऑक्टोबर रोजी होणार आहे.