SA vs WI 1st Test : फिरकी गोलंदाज केशव महाराजचा मोठा विक्रम, ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला द. आफ्रिकेचा दुसरा खेळाडू …

SA vs WI 1st Test ,Keshav Maharaj : दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे जिथे तो यजमान संघाविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. उभय संघांमधील मालिकेतील पहिला सामना त्रिनिदादच्या पोर्ट ऑफ स्पेनच्या मैदानावर खेळवला जात आहे, चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडे 154 धावांची आघाडी होती. या सामन्याच्या चौथ्या दिवशी आफ्रिकन संघाचा गोलंदाज केशव महाराज याची चमकदार कामगिरी पाहायला मिळाली ज्यात त्याने 4 विकेट्स घेतल्या, यासोबतच तो एक विशेष कामगिरी करण्यात यशस्वी ठरला.
अशी कामगिरी करणारा केशव महाराज ठरला आफ्रिकेचा दुसरा फिरकी गोलंदाज…
वेस्ट इंडिजविरुद्धच्या त्रिनिदाद कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी, दक्षिण आफ्रिका संघाकडून केशव महाराज याने शानदार कामगिरी केली. यजमान संघाला पहिल्या डावात 233 धावांवर रोखण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. केशवने 40 षटकांच्या गोलंदाजीमध्ये 15 षटके मेडन्स (निर्धाव) टाकताना 76 धावा देत 4 बळी घेतले.
Magical Maharaj! ✨
Keshav was the pick of the bowlers as he ripped through the Indies batters.
Simply sublime.🙂↕️#WozaNawe #BePartOfIt#SAvWI pic.twitter.com/lb9KbbyZDT
— Proteas Men (@ProteasMenCSA) August 11, 2024
यासह केशव महाराजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये 250 विकेट्स पूर्ण केल्या आणि अशी कामगिरी करणारा तो दक्षिण आफ्रिकेचा दुसरा फिरकी गोलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी इम्रान ताहिरने ही कामगिरी केली होती. इम्रानने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत तिन्ही फॉरमॅटसह एकूण 291 विकेट्स घेतल्या आहेत.
पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिका मजबूत स्थितीत…
जर आपण त्रिनिदाद कसोटी सामन्याबद्दल बोललो तर त्यात अधिक पावसाचा खेळ पाहायला मिळाला. पहिल्या कसोटीतील चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या संघाने दुसऱ्या डावात 5 षटकात बिनबाद 30 धावा केल्या होत्या. त्याआधी वेस्ट इंडिज संघाचा पहिला डाव 233 धावांवर आटोपला. तत्पूर्वी, या सामन्याच्या पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 357 धावा केल्या होत्या.





