The Hundred Mens Competition 2024 : पोलार्डचे 6,6,6,6,6…! द हंड्रेडमध्ये सामन्यात केली राशिद खानची धुलाई, पाहा Video…

The Hundred Mens Competition 2024 :– सध्या इंग्लंडमध्ये द हंड्रेड क्रिकेट लीग खेळवली जात आहे. या लीगचा २४ वा सामना साउथॅम्प्टनमधील द रोज बॉल क्रिकेट मैदानावर सदर्न ब्रेव्ह आणि ट्रेंट रॉकेट्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात सदर्न ब्रेव्ह संघाने २ गडी राखून विजय मिळवला. ट्रेंट रॉकेट्सचा स्टार गोलंदाज राशिद खानसाठी हा सामना खूपच वाईट गेला कारण, वेस्ट इंडिजच्या निवृत्त फलंदाज कायरन पोलार्डने त्याच्या एक षटकात सलग पाच षटकार ठोकले.
द हंड्रेड क्रिकेट लीगमध्ये १००-१०० चेंडूंचे सामने होतात आणि एका षटकात ५ चेंडू असतात. अशात पोलार्डने एका षटकातील सर्व चेंडूवर षटकार मारण्याचा पराक्रम केला. द हंड्रेड क्रिकेट लीगच्या इतिहासात एका षटकात फलंदाजाने ५ षटकार मारण्याची ही पहिलीच वेळ आहे. पोलार्डने सदर्न ब्रेव्हच्या डावाच्या १७व्या षटकात ही कामगिरी केली.
Pollard Hits Five Consecutive Sixes in Rashid Khan Over.
Kieron Pollard always a destructive Player.pic.twitter.com/KyT3yPldJM
— Vijay M M (@mathivijaym) August 10, 2024
या सामन्यात ट्रेंट रॉकेट्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याने १०० चेंडूत ८ गडी गमावून १२६ धावा केल्या. प्रत्युत्तरात सदर्न ब्रेव्ह संघाने हे लक्ष्य ९९ चेंडूत ८ गडी गमावून पूर्ण केले. यादरम्यान पोलार्डने सदर्न ब्रेव्हसाठी सर्वात मोठी खेळी खेळली. त्याने २३ चेंडूत १९५.६५ च्या स्ट्राईक रेटने ४५ धावा केल्या. किरॉन पोलार्डच्या या खेळीत २ चौकार आणि ५ षटकार पाहायला मिळाले. या दमदार खेळीसाठी त्याला सामनावीर म्हणूनही गौरवण्यात आले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटममध्येही विक्रमाचा मानकरी
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग ६ षटकार मारणारा पोलार्ड हा देखील एक फलंदाज आहे. २०२१ मध्ये त्याने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात अकिला धनंजयाविरुद्ध एकाच षटकात ६ षटकार मारले होते. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ही कामगिरी करणारा तो युवराज सिंगनंतर जगातील दुसरा फलंदाज ठरला. पोलार्ड जरी निवृत्त झाला असला तरी टी-२० क्रिकेटमध्ये त्याच्या बॅटची धार अजून कमी झालेली नाही, हेच या घटनेवरून दिसते.





