ICC Rankings : केशव महाराज ठरला फिरकीचा नवा बादशहा! ऑस्ट्रेलियाविरुद्ध कमाल करत वनडे क्रमवारीत पटकावलं अव्वल स्थान

ICC Ranking Updates Keshav Maharaj Became No 1 ODI Bowler : दक्षिण आफ्रिकेचा स्टार फिरकी गोलंदाज केशव महाराजने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यातील दमदार कामगिरी केली. या कामगिरीच्या जोरावर त्याने आयसीसीच्या ताज्या वनडे गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. मंगळवारी झालेल्या सामन्यात महाराजने १० षटकांत केवळ ३३ धावा देत ५ विकेट्स घेतल्या.
केशव महाराजने केली कमाल –
त्याच्या या भेदक गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाचा संघ २९७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अवघ्या १९८ धावांत गारद झाला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने हा सामना ९९ धावांनी जिंकला, जो ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर धावांच्या फरकाने मिळवलेला दक्षिण आफ्रिकेचा सर्वात मोठा विजय ठरला.
प्रथमच वनडे सामन्यात घेतल्या ५ विकेट्स –
Proteas spinner Maharaj regains number 1 ODI spot following fifer against Australia
Read @ANI Story | https://t.co/ltiaAfMSFw#KeshavMaharaj #SouthAfrica #ICCRankings #cricket pic.twitter.com/EqeAiqiyng
— ANI Digital (@ani_digital) August 20, 2025
डाव्या हाताचा फिरकीपटू केशव महाराजने प्रथमच वनडे क्रिकेटमध्ये एका डावात ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. या शानदार कामगिरीसह त्याने आपल्या वनडे कारकिर्दीत नवीन टप्पा गाठला. आतापर्यंत खेळलेल्या ४९ वनडे सामन्यांमध्ये त्याने ३०.४६ च्या सरासरीने आणि ४.५८ च्या इकॉनॉमी रेटने ६३ विकेट्स घेतल्या आहेत.
हेही वाचा – Asia Cup : टीम इंडियाच्या सिलेक्शनमध्ये नवा ट्विस्ट! ‘या’ 5 जणांची स्टँडबाय खेळाडू म्हणून निवड
आयसीसी वनडे गोलंदाजी ताजी क्रमवारी –
आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत टॉप-१० गोलंदाजांमध्ये तब्बल ९ फिरकीपटूंचा समावेश आहे, तर न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्री हा एकमेव वेगवान गोलंदाज या यादीत आहे. क्रमवारीत केशव महाराज (६८७ रेटिंग) प्रथम क्रमांकावर आहे, तर श्रीलंकेचा महिश तीक्ष्णा (६७१ रेटिंग) दुसऱ्या आणि भारताचा स्टार फिरकीपटू कुलदीप यादव (६५० रेटिंग) तिसऱ्या स्थानावर आहे. भारताचा रवींद्र जडेजा (६१६ रेटिंग) नवव्या स्थानावर आहे, तर ऑस्ट्रेलियाचा अॅडम झम्पा (६०८ रेटिंग) दहाव्या स्थानावर आहे.
टॉप-१० गोलंदाजांची यादी :
- केशव महाराज (दक्षिण आफ्रिका) – ६८७ रेटिंग
- महिश तीक्ष्णा (श्रीलंका) – ६७१ रेटिंग
- कुलदीप यादव (भारत) – ६५० रेटिंग
- बर्नार्ड स्कोल्ट्झ (नामिबिया) – ६४४ रेटिंग
- राशिद खान (अफगानिस्तान) – ६४० रेटिंग
- मिचेल सँटनर (न्यूझीलंड) – ६३७ रेटिंग
- मॅट हेन्री (न्यूझीलंड) – ६२२ रेटिंग
- वानिंदु हसरंगा (श्रीलंका) – ६१९ रेटिंग
- रवींद्र जडेजा (भारत) – ६१६ रेटिंग
- अॅडम झाम्पा (ऑस्ट्रेलिया) – ६०८ रेटिंग
हेही वाचा – Women’s World Cup 2025 : वनडे वर्ल्डकप 2025 साठी भारतीय महिला संघ जाहीर
या क्रमवारीत फक्त अव्वल स्थानावर बदल झाला असून, इतर गोलंदाज आपापल्या स्थानांवर कायम आहेत. केशव महाराजच्या या कामगिरीने फिरकी गोलंदाजांचे वनडे क्रिकेटमधील वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.





