Prithvi Shaw Captain : वैयक्तिक वादांच्या वादळात पृथ्वी शॉला मिळाली मोठी जबाबदारी! थेट ‘या’ संघाच्या कर्णधारपदी निवड
Prithvi Shaw Captain : २६ वर्षीय फलंदाज पृथ्वी शॉच्या खांद्यावर ऋतुराज गायकवाडच्या अनुपस्थित मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Prithvi Shaw Appointed Maharashtra Captain Ranji Trophy Ruturaj Gaikwad India A Duty : वैयक्तिक आयुष्यातील अनेक चढ-उतारांनंतर भारताचा धडाकेबाज २६ वर्षीय फलंदाज पृथ्वी शॉच्या (Prithvi Shaw) क्रिकेट कारकिर्दीला एक नवी कलाटणी मिळाली आहे. आगामी रणजी करंडक (Ranji Trophy) स्पर्धेच्या पहिल्या फेरीसाठी महाराष्ट्र सीनियर पुरुष क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी पृथ्वी शॉची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र संघ आपल्या मोहिमेची सुरुवात ११ ऑक्टोबरपासून नवी दिल्लीतील पालम ‘ए’ स्टेडियमवर सर्व्हिसेसविरुद्ध करणार असून, या सामन्यात पृथ्वी शॉ नाणेफेकीसाठी मैदानात उतरेल.
ऋतुराज ‘इंडिया ए’च्या ड्युटीवर; अर्शिन कुलकर्णीही पहिल्या सामन्यातून बाहेर!
महाराष्ट्राचा नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) ऑस्ट्रेलिया ‘ए’ विरुद्ध पुद्दुचेरी येथे होणाऱ्या अनऑफिशियल एकदिवसीय मालिकेसाठी ‘इंडिया ए’ संघाचे नेतृत्व करत आहे. ही मालिका ६, ९ आणि ११ ऑक्टोबर रोजी होणार असल्याने ११ ऑक्टोबरच्या रणजी सामन्यासाठी ऋतुराज उपलब्ध नाही. याशिवाय युवा अष्टपैलू खेळाडू अर्शिन कुलकर्णीदेखील ‘इंडिया ए’ संघात असल्याने तो पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही. त्यामुळे निवड समितीने नेतृत्वाची धुरा पृथ्वी शॉच्या खांद्यावर सोपवली.
मुंबई सोडून महाराष्ट्राशी जुळला; पदार्पणाच्या हंगामात ५३७ धावांचा पाऊस!
🚨 BREAKING 🚨
Prithvi Shaw will captain Maharashtra in their opening Ranji Trophy match against Services. 🏆
Ruturaj Gaikwad will miss the game as he is away on India A duty. 🇮🇳🏏#Cricket #RanjiTrophy #PrithviShaw pic.twitter.com/Qma3ThYEZI
— Sportskeeda (@Sportskeeda) October 4, 2026
पृथ्वी शॉ २०२५-२६ च्या देशांतर्गत हंगामापूर्वी मुंबई सोडून महाराष्ट्र संघात दाखल झाला होता. पदार्पणाच्याच हंगामात त्याने ७ सामन्यांच्या ११ डावांत ५३७ धावांची लयलूट करत महाराष्ट्रासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरण्याचा मान मिळवला होता. आगामी सामन्यात शॉच्या नेतृत्वाखाली अनिकेत बावणे, विकी ओस्तवाल, राजवर्धन हंगरगेकर आणि मुकेश चौधरी यांसारखे स्टार खेळाडू मैदानात उतरतील.
अंडर-१९ वर्ल्डकप ते विजय हजारे; नेतृत्वाचा भक्कम अनुभव!
रेड-बॉल आणि व्हाईट-बॉल दोन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधार म्हणून पृथ्वीचा ट्रॅक रेकॉर्ड उल्लेखनीय राहिला आहे. २०१८ मध्ये त्याच्याच नेतृत्वाखाली भारताने अंडर-१९ विश्वचषक जिंकला होता. २०२१-२२ च्या रणजी हंगामात त्याने मुंबईला उपविजेतेपद मिळवून दिले, तसेच मुंबईला विजय हजारे ट्रॉफीचे जेतेपद जिंकून देताना नाबाद २२७ धावांसह एकाच हंगामात तब्बल ८२७ धावा कुटल्या होत्या. आता पहिल्यांदाच तो महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करताना दिसेल.





