टेकऑफनंतर हवेतच बेपत्ता झाले विमान ; विमानात होते ५० प्रवासी, जाणून घ्या नेमकं काय झालं ?

Russian plane disappears। रशियामधून एक अतिशय चिंताजनक बातमी येत आहे. अंगारा एअरलाइन्सचे एक प्रवासी विमान उड्डाणानंतर काही वेळातच रडारवरून गायब झाले आहे. विमानात ५० प्रवासी होते ज्यात काही लहान मुलांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे मॉस्कोमध्ये खळबळ उडाली आहे. सध्या या विमानाचा शोध घेण्यात येत असल्याचे म्हटले जात आहे.
विमानाने उड्डाण करताच एटीसीशी संपर्क तुटला Russian plane disappears।
समोर आलेल्या माहितीनुसार, विमानाने इर्कुत्स्क शहरातून उड्डाण केले होते आणि ते याकुत्स्कला पोहोचणार होते, परंतु उड्डाणानंतर काही वेळातच त्याचा एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) शी संपर्क तुटला. अनेक प्रयत्न करूनही विमानाशी संपर्क होऊ शकला नाही, त्यामुळे अपघाताची भीती वाढत आहे.
शोध मोहीम सुरू Russian plane disappears।
रशियन आपत्कालीन मंत्रालयाने शोध आणि बचाव मोहीम सुरू केली आहे. सध्या बेपत्ता विमानाचा शोध घेण्यासाठी हेलिकॉप्टर आणि ड्रोन तैनात करण्यात आले आहेत. खराब हवामान आणि परिसरातील दुर्गमतेमुळे शोध मोहिमेत अडचणी येत आहेत. विमान कोसळले की आपत्कालीन लँडिंग केले याची अधिकृतपणे पुष्टी सरकारी अधिकाऱ्यांनी अद्याप केलेली नाही. संपूर्ण देशाचे डोळे आता या मोहिमेवर लागले आहेत. प्रवाशांचे नातेवाईक विमानतळावर जमले आहेत आणि त्यांना सतत माहिती दिली जात आहे.





