Russia Ukraine War। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की रविवारी फ्लोरिडामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. यामुळे रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपण्याची आशा पल्लवित झाल्यात. या भेटीत युक्रेनसाठी सुरक्षा हमींवर चर्चा होईल असे झेलेन्स्की यांनी सांगितले. तसच २० कलमी शांतता योजना लवकरच अंतिम केली जाईल असही त्यांनी सांगितलय. ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यातील ही बैठकअसा वेळी होतीय ज्यावेळी अमेरिका हे युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला झेलेन्स्की यांनी जर रशियाने पूर्व औद्योगिक क्षेत्राच्या काही भागातून आपले सैन्य मागे घेतले तर युक्रेनही असेच करण्याचा विचार करेल असं म्हटलं होतं. त्यामुळे उद्या होणारी ही बैठक महत्वाची ठरणार आहे. रशियाला डोनबासवर नियंत्रण हवं Russia Ukraine War। रशियाने झेलेन्स्कीचा कोणताही प्रस्ताव स्वीकारणार नसल्याचे सांगितले आहे. युक्रेनने डोनबासमधील त्यांचा नियंत्रित प्रदेश रशियन सैन्याला सोपवावा असा क्रेमलिनचा आग्रह आहे, जो कीवने नाकारला आहे. रशियन सैन्याने सध्या लुहान्स्कचा बहुतांश भाग आणि डोनेत्स्कचा सुमारे ७० टक्के भाग व्यापला आहे, हे दोन्ही प्रदेश डोनबासमधील आहेत. अमेरिकन अधिकाऱ्यांसोबतच्या अलिकडच्या बैठकींनंतर रशियाच्या विशेष दूताने युक्रेनला सादर केलेल्या शांतता प्रस्तावाचे मॉस्को विश्लेषण करत असल्याचे क्रेमलिनने म्हटले आहे. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी गुरुवारी याची घोषणा केली. पेस्कोव्ह यांनी सांगितले की रशिया गुंतवणूक आणि आर्थिक सहकार्यासाठी राष्ट्रपतींचे विशेष प्रतिनिधी किरिल दिमित्रीव्ह यांनी दिलेल्या माहितीची तपासणी करत आहे. रशियन-अमेरिकन अधिकाऱ्यांची भेट Russia Ukraine War। दिमित्रीव्ह यांनी गेल्या आठवड्यात मियामीमध्ये अमेरिकन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पेस्कोव्ह म्हणाले, “आम्ही या सर्व गोष्टींचे विश्लेषण करत आहोत आणि त्यानंतर, राष्ट्रप्रमुखांनी घेतलेल्या निर्णयानुसार, अमेरिकेच्या बाजूने पुढील सल्लामसलत सुरू राहील.” यापूर्वी, पेस्कोव्ह म्हणाले होते की दिमित्रीव्ह यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना मियामी भेटीच्या निकालांची माहिती दिली होती. रविवारी (२१ डिसेंबर २०२५) फ्लोरिडामध्ये रशिया आणि युक्रेनियन शिष्टमंडळांनी अमेरिकेशी स्वतंत्र चर्चा केली. रशियन वृत्तसंस्था स्पुतनिकनुसार, दिमित्रीव्ह यांनी माध्यमांना सांगितले की युद्धखोरांच्या प्रयत्नांना न जुमानता, रशिया-अमेरिका चर्चा विस्कळीत होऊ शकल्या नाहीत. दरम्यान, रशियन संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी वृत्त दिले की त्यांच्या दक्षिणी गटाच्या सैन्याने डोनेस्तक प्रदेशातील स्वीयाटो-पोक्रोव्स्केच्या वस्तीचा ताबा घेतला आहे.