लवकरच युद्ध संपणार? ; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर ट्रम्प म्हणाले, ‘मी खूप खुश, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना…’

Trump Zelensky meeting। रशिया आणि युक्रेनमध्ये लवकरच शांतता करार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या संदर्भात मोठे संकेत दिले आहेत. त्यांनी काल युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्याशी बैठक घेतली. यावेळी ट्रम्प यांनी अनेक मोठ्या युरोपीय नेत्यांच्याही भेटी घेतल्या. त्यानंतर त्यांनी महत्त्वाची माहिती सर्वाना सांगितली.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती देताना, “झेलेन्स्की यांच्याशी माझी चांगली चर्चा झाली. युरोपीय देश युक्रेनला सुरक्षेची हमी देतील.”असे म्हटले आहे. तसेच ट्रम्प यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून, “युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब, इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान केयर स्टारमर, जर्मन चांसलर फ्रेडरिक मर्झ, युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन आणि नाटोचे सरचिटणीस मार्क रुट यांच्याशी माझी व्हाईट हाऊसमध्ये चांगली चर्चा झाली.” असे सांगत आपण खुश असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.
रशिया-युक्रेनमधील शांतता करारावर ट्रम्प काय म्हणाले?
डोनाल्ड ट्रम्प यांनी संकेत दिले की, रशिया आणि युक्रेनमध्ये लवकरच शांतता करार होऊ शकतो. ते म्हणाले, “अनेक युरोपीय देश अमेरिकेशी समन्वय साधून युक्रेनला सुरक्षेची हमी देतील. बैठकीत यावरही चर्चा झाली. रशिया आणि युक्रेनमधील शांततेच्या शक्यतेबद्दल सर्वांना खूप आनंद आहे. बैठकींच्या शेवटी, मी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना फोन केला आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यात नियुक्त ठिकाणी बैठक आयोजित करण्यास सुरुवात केली.”अशी महत्वाची माहिती ट्रम्प यांनी यावेळी दिली.
ट्रम्प पुन्हा पुतिन-झेलेन्स्की यांची भेट घेणार
व्लादिमिर पुतिन आणि वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यातील बैठकीनंतर आणखी एक बैठक आयोजित केली जाईल. ट्रम्प म्हणाले, “त्या बैठकीनंतर, आम्ही आणखी एक बैठक आयोजित करू, ज्यामध्ये मी झेलेन्स्की-पुतिन यांच्यासोबत सहभागी होईन. जवळजवळ चार वर्षांपासून सुरू असलेले युद्ध संपवण्यासाठी हे एक खूप चांगले पाऊल आहे. उपाध्यक्ष जेडी व्हान्स, परराष्ट्र सचिव मार्को रुबियो आणि विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ रशिया आणि युक्रेनशी समन्वय साधत आहेत. या प्रकरणाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद!





