रशियाचा मिशन बदला ! ड्रोन, क्रूझ आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी युक्रेनवर हल्ला ; हल्ल्यात ५ जण ठार

Russia-Ukraine war। काही दिवसापूर्वी युक्रेनने रशियावर आजपर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करत रशियाचे मोठे नुकसान केले होता. या हल्ल्यानंतर रशियाने देखील याचा हिशेब चुकता करण्यात येईल असे म्हटले होते. त्यानुसर आता रशियाने ५ दिवसांनी या हल्ल्याचं बदल घेतला आहे. रशियाने युक्रेनवर ड्रोनचा वर्षाव केला आहे आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी कहर केला आहे. त्यामुळे आता युक्रेनमध्ये हवाई संरक्षण प्रणाली सक्रिय करण्यात आली आहे. कीवमधील ओब्लोन आणि क्लीत्स्को जिल्ह्यांमध्ये सायरन सतत वाजत आहेत. रशियन हल्ल्यात पाच युक्रेनियन लोकांचा मृत्यू झाला आहे, खार्किवमध्ये चार मुले जखमी झाली आहेत आणि एकूण डझनभर लोक जखमी झाले आहेत.
राष्ट्राध्यक्ष पुतिन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी बोलत असताना काही तासच झाले आहेत. याच काळात त्याने आपला हेतू व्यक्त केला. १ जून रोजी रशियावर युक्रेनियन हल्ल्यानंतर पुतिन काय विचार करत होते हे ट्रम्प यांनी जगाला सांगितले. युक्रेनने रशियावर हल्ला केल्यानंतर ट्रम्प यांनी पुतिन यांना शांत करण्यासाठी १ तास त्यांच्याशी चर्चा केली. पण पुतिन सहमत नव्हते. या संभाषणानंतर पुतिन यांच्या मनःस्थितीचे वर्णन करताना ट्रम्प यांनी , “राष्ट्रपती पुतिन यांनी मला अगदी स्पष्टपणे आणि ठामपणे सांगितले की विमानतळांवर झालेल्या अलिकडच्या हल्ल्यांना त्यांना प्रत्युत्तर द्यावे लागेल.”असे म्हटले होते.
ट्रम्प यांचे शब्द खरे ठरले Russia-Ukraine war।
ट्रम्प यांनी यापूर्वी सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये इशारा दिला होता की एक तासाच्या फोन कॉलमुळे रशिया आणि युक्रेनमध्ये “तात्काळ शांतता” येणार नाही. युक्रेनविरुद्ध रशियाच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे या युद्धात शांततेच्या सर्व शक्यता धुळीस मिळाल्या आहेत. ट्रम्प यांचे शब्द खरे ठरले आणि २४ तासांच्या आत पुतिन यांनी युक्रेनवर हल्ला केला.
युक्रेनियन हवाई दलाने शुक्रवारी टेलिग्रामवर सांगितले की, रशियन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन अनेक दिशांनी युक्रेनकडे डागण्यात आले आहेत.कीव शहराच्या लष्करी प्रशासनाचे प्रमुख तकाचेन्को म्हणाले की, ड्रोन हल्ला रोखताना कीवमधील अनेक इमारतींना आग लागली. त्या विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एल इंग्रजी वृत्तवाहिनीनूसार, कीवमध्ये दोन मोठे स्फोट ऐकू आले. कीव, टेर्नोपिल, खमेलनित्स्की ओब्लास्ट, ल्विव्ह आणि लुत्स्क येथे स्फोट झाल्याची नोंद झाली.
युक्रेनकडून रशियाच्या हल्ला झाल्याची पुष्टी Russia-Ukraine war।
युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी गुरुवारी सांगितले की, रशियाने डोनेस्तक, खार्किव्ह, ओडेसा, सुमी, चेर्निहिव्ह, डनिप्रो आणि खेरसनसह अनेक प्रदेशांवर रात्री १०३ ड्रोन आणि एक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागले. या हल्ल्यात काही लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत आणि मालमत्तेचेही नुकसान झाले आहे. एका निवेदनात, युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी पुष्टी केली की चेर्निहिव्हमधील एका निवासी इमारतीवर “शाहेद” ड्रोनने हल्ला केला. शाहेद ड्रोन हे शाहेद एव्हिएशन इंडस्ट्रीजने विकसित केलेले इराणी मानवरहित लढाऊ हवाई वाहने आणि लोटेरिंग शस्त्रे आहेत. शाहेद ड्रोन इराण आणि रशिया या दोन्ही देशांमध्ये बनवले जातात.
युक्रेनचे परराष्ट्र मंत्री आंद्री त्सिबिहा म्हणाले: “रात्रभर रशियाने युक्रेन आणि युक्रेनियन लोकांविरुद्ध दहशत सुरू ठेवली. लोक जखमी झाले आणि ठार झाले. खार्किवमध्ये किमान चार मुले जखमी झाली.” सिबिहा यांनी जोर देऊन सांगितले की रशियाला शांतता नको आहे. ते अल्टिमेटम जारी करते आणि नागरिकांना लक्ष्य करते. त्यांनी कडक आंतरराष्ट्रीय कारवाईचे आवाहन केले.
झेलेन्स्की यांनी अतिरिक्त निर्बंध आणि आंतरराष्ट्रीय दबाव आणण्याची मागणी केली. “या भयानक परिस्थितीत खरोखर बदल घडवून आणण्यास मदत करू शकेल अशी कृती करण्यासाठी आम्ही अमेरिका, युरोप आणि जगातील प्रत्येकाकडे पाहत आहोत,” असे ते म्हणाले. “सर्व उपलब्ध मार्गांचा वापर करून मॉस्कोवर दबाव आणला पाहिजे.” अस ते म्हणाले. तसेच रशिया सतत आपल्या हत्या सुरू ठेवण्यासाठी वेळ घेत आहे. जेव्हा त्याला जगाकडून पुरेसा निषेध आणि दबाव जाणवत नाही. म्हणून तो पुन्हा मारतो.
युक्रेनियन एजन्सींनी रशियाच्या अंतर्गत भागात मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ल्यांची मालिका सुरू केल्यानंतर काही दिवसांनीच युक्रेनवर रशियन क्षेपणास्त्र हल्ला झाला आहे. या दरम्यान, रशियन विमानतळांवर हल्ला करण्यात आला आणि ४१ रशियन लष्करी विमाने पाडण्यात आली. मंगळवारी, युक्रेनने रशिया आणि क्रिमियन द्वीपकल्पातील एकमेव थेट दुवा असलेल्या केर्च पुलावरही हल्ला केला. हा हल्ला करण्यासाठी युक्रेनने ११०० किलो स्फोटके पाण्याखाली पेरली होती.
हेही वाचा
अमेरिकेच्या जय-वीरूची जोडी का तुटली? ; ट्रम्प-मस्क यांच्यातील वादाच नेमकं काय कारण?, वाचा सविस्तर





