अमेरिकेच्या जय-वीरूची जोडी का तुटली? ; ट्रम्प-मस्क यांच्यातील वादाच नेमकं काय कारण?, वाचा सविस्तर

Donald Trump vs Elon Musk । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांच्यातील वाद आता चांगलाच विकोपाला गेला आहे. ट्रम्प आणि मस्क हे खूप जवळचे मित्र होते, पण आता त्यांच्यात काहीच आलबेल नसल्याचे दिसत आहे. दोघेही सार्वजनिक व्यासपीठांवर एकमेकांवर हल्लाबोल करत करत आहेत. नुकतेच डोनाल्ड ट्रम्प यांनी मस्क यांना धमकीही दिली आहे. त्यांनी,मस्कचे सर्व सरकारी करार रद्द केले जातील” अशी उघडपणे धामिर्कच दिली आहे. तर दुसरीकडे, मस्क यांनी ट्रम्प यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांच्यातील वादाला एक विशेष विधेयक कारणीभूत ठरले आहे. मस्क यांनी ट्रम्प यांच्या कर आणि खर्चाशी संबंधित विधेयकावर भाष्य केले होते. त्यांनी त्यावर जोरदार टीका करत हे सार्वजनिक पैसे वाया घालवण्याचे विधेयक आहे. हे लज्जास्पद आहे” असे म्हणत ट्रम्प सरकारवर टीका केली होती. मस्क यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. त्यात त्यांनी “हे सर्व सहनशीलतेच्या पलीकडे आहे. हे विधेयक रात्री मंजूर झाले आहे, जेणेकरून त्यावर अधिक चर्चा होऊ नये.” असे म्हणत गंभीर आरोप केले होते.
मस्क यांच्या टीकेनंतर ट्रम्प संतापले Donald Trump vs Elon Musk ।
एलॉन मस्क यांनी केलेल्या टीकेमुळे ट्रम्प यांचा राग अनावर झाला. मस्क यांच्या टीकेला उत्तर देताना त्यांनी,” विधेयकावरील या टिप्पणीने ते खूप निराश आहेत” असे म्हटले. तसेच ट्रम्प यांनी दावा केला की, मस्क यांना या विधेयकाबद्दल सर्व काही माहित होते, परंतु त्यांनी आधी त्यावर प्रतिक्रिया दिली नव्हती.” अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी पुढे सांगताना,”जेव्हा मस्क यांना कळेल की इलेक्ट्रिक वाहनांच्या अनुदानात कपात केली जात आहे, तेव्हा त्यांच्या कंपन्यांना अब्जावधी डॉलर्सचे नुकसान होईल.” असा आरोप देखील यावेळी त्यांनी केला. तसेच हा आरोप करताना ट्रम्प यांनी मस्क यांना धमकी देत मास्क यांना देण्यात येणारी सर्व सरकारी अनुदाने भविष्यत बंद करण्यात येतील अशी थेट धमकीच त्यांनी दिली.
मस्क यांनी ट्रम्प यांना चोख उत्तर दिले Donald Trump vs Elon Musk ।
त्यानंतर एलॉन मस्क यांनी एक पोस्ट शेअरकरत, “ट्रम्प खोटे बोलतोय, हे बिल मला एकदाही दाखवले गेले नाही.” असा दावा केला आहे. मस्क यांनी असेही म्हटले आहे की जर त्यांनी ट्रम्पला पाठिंबा दिला नसता तर ट्रम्प निवडणूक हरले असते. ट्रम्प आणि मस्क यांच्यातील संघर्षामुळे वॉशिंग्टन डीसीच्या राजकारणात बरीच खळबळ उडाली आहे. रिपब्लिकन खासदारही द्विधा मनस्थितीत आहेत. त्यांना समजत नाही की त्यांनी ट्रम्पसोबत जावे की मस्कसोबत जावे.





