Russia Ukraine war Update | रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्याऐवजी वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यातच आता रशियन सैन्याने शुक्रवारी रात्री इस्कंदर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी युक्रेनची राजधानी कीव्हवर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात 4 नागरिकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना कीव्हच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. युक्रेनवर हा हल्ला रात्री सुमारे 11 वाजता सुरू झाला. रशियन क्षेपणास्त्रांनी कीव्हच्या बाहेरील भागात असलेल्या प्रमुख विद्युत केंद्रांना आणि रेल्वे जंक्शनला लक्ष्य केले. याबाबत कीवचे महापौर विटाली क्लिट्स्को यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले की, राजधानीत स्फोट झाले आहेत आणि शहरावर बॅलिस्टिक हल्ला होत आहे. आमची 40 टक्के ऊर्जा यंत्रणा नष्ट झाली आहे. हजारो घरांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे आणि रुग्णालयांना जनरेटरवर अवलंबून राहावे लागत आहे. रेल्वे यंत्रणेलाही मोठा फटका बसला असून, मुख्य स्थानकावरील रेल्वे रूळ उखडले गेले आणि अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या. तसेच हल्ल्यात अनेक निवासी इमारती, घरं, दुकानं आणि वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. Russia Ukraine war Update | ‘जगाने रशियाची आक्रमकता थांबवली पाहिजे’ यावर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दोमीर झेलेन्स्की यांनी व्हिडीओ संदेश जारी करून म्हटले की, हा हल्ला आमच्या लोकांच्या हत्येचा प्रयत्न आहे. आम्ही प्रतिकार सुरू ठेवू, पण जगाने रशियाची आक्रमकता थांबवली पाहिजे. त्यांनी नाटो देशांना शस्त्रास्त्र पुरवठा वाढवण्याचे आवाहन केले. तसेच दरम्यान, युक्रेनच्या अधिकार्यांनी याला ‘युद्ध गुन्हा’ ठरवत आंतरराष्ट्रीय समुदायाकडे तत्काळ हस्तक्षेपाची मागणी केली आहे Russia Ukraine war Update | हेही वाचा : Pune District : बोरी-खोडद गटात मोठी चुरस