रूपगंध : इतिहासात हरवलेले मॅक्लुस्कीगंज

झारखंडची राजधानी रांचीपासून सुमारे 45 किलोमीटर अंतरावर मॅक्लुस्कीगंज हे नाव ङ्गार कोणाला ठाऊक नसेल. अर्थात पश्चिम बंगाल, झारखंडच्या लोकांना ठाऊक असेल. विशेष म्हणजे या भागाला कधीकाळी भारताचे मिनी लंडन आणि मिनी ब्रिटन असे म्हटले जात होते. मात्र हा भाग आता आपल्या गौरवशाली इतिहासात आणि अनिश्चितेच्या भविष्यात हरवत चालला आहे.
झारखंडची राजधानी रांचीपासून सुमारे 45 किलोमीटर अंतरावर मॅक्लुस्कीगंज हे नाव ङ्गार कोणाला ठाऊक नसेल. अर्थात पश्चिम बंगाल, झारखंडच्या लोकांना ठाऊक असेल. विशेष म्हणजे या भागाला कधीकाळी भारताचे मिनी लंडन आणि मिनी ब्रिटन असे म्हटले जात होते. मात्र हा भाग आता आपल्या गौरवशाली इतिहासात आणि अनिश्चितेच्या भविष्यात हरवत चालला आहे.
किट्टी मेमसाब या मॅक्लुस्कीगंजच्या गौरवशाली इतिहासाच्या साक्षीदार आहेत. त्यांना या भागाचे इनसायक्लोपेडिया असेही म्हटले जाते. त्या इथे राहणार्या निवडक अँग्लो इंडियन कुटुंबातील आहेत. सध्या त्या शहराच्या बाह्य भागातील एका लहान घरात मुलासह राहतात. किट्टीचे आजोबा एडवर्ड डॅनियल रॉबर्ट हे इंग्रजांच्या राजवटीत आसामच्या गव्हर्नरचे सचिव होते. आजोबा आणि आईच्या मृत्युनंतर किटी यांनी स्थानिक रमेश मुडा यांच्याशी विवाह केला.
72 वर्षीय किट्टी मेमसाब यांच्या तोंडी या भागातील गौरवशाली इतिहासाचा विषय निघतो तेव्हा त्यांच्या डोळ्यात अनोखी चमक पाहवयास मिळते. मॅक्लुस्कीगंजमध्ये चित्रपटाचे शूटिंग करण्यासाठी आलेल्या असंख्य दिग्दर्शकांनी किट्टी यांना कोणत्या ना कोणत्या पात्राच्या रुपातून शूट केलेले आहे. दोन दशकांपूर्वी त्या स्थानिक रेल्वे स्थानकावर ङ्गळ विक्रीचा व्यवसाय करत असत. अस्खलीत इंग्रजी, हिंदी आणि स्थानिक भाषेवर त्यांचे प्रभुत्व आहे. मात्र तब्येत चांगली नसल्याने त्यांनी काम सोडून दिले. आता त्यांचा संपूर्ण दिवस मेंढपाळ व्यवसायात जातो. त्या म्हणतात, आमचा जन्म आणि मृत्यू इथेच आहे. त्या मूळच्या रहिवाशी नाहीत. जुन्या आठवणी सांगताना त्या म्हणतात,
नेहमीसारखी सकाळ असायची. पूर्वी रांचीला जाण्यासाठी गाडी नसायची. या ठिकाणी रुग्णालय आणि शाळेचा अभाव होता. त्यामुळे स्थानिक युवक शिकण्यासाठी बाहेर जात असत. काही जण तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीसाठी बाहेरगावी निघून गेले. आता केवळ नऊ कुटुंबच राहिले आहेत. पूर्वी या भागाला मिनी लंडन म्हटले जात होते. पर्यटक देखील थोडेङ्गार येतात. मात्र परदेशातील पर्यटक तर कधीतरी येतात.
कशी झाली सुरुवात
1932 मध्ये इटी मॅक्लुस्की यांनी या ठिकाणी जमीन खरेदी केली. त्यांनी देशभरातील अँग्लो इंडियन समुदायाला इथे वास्तव्य करण्याची योजना आखली होती. अँग्लो इंडियन लोकांसाठी शहर वसविण्यासाठी अर्नेस्ट टिमोथी मॅक्लुस्की यांनी रातू महाराज यांच्याकडून सुमारे दहा हजार एकर जमीन भाड्यावर घेतली. 1933 मध्ये मॅक्लुस्की यांनी कोलीनायजेशन सोसायटी ऑङ्ग इंडिया लिमिटेडची स्थापना केली आणि महाराजासमवेत करार केला. दुर्देवाने त्यांचा अकाली मृत्यू झाला. पहिल्या महायुद्धानंतर या ठिकाणचे नागरिक रोजगारासाठी बाहेर पडू लागले. एकेकाळी या ठिकाणी 400 कुटुंब राहत हेाते. परंतु आता ती संख्या बोटावर मोजण्याइतपत राहिली आहे. काळाच्या प्रवाहानुसार आणि बदलणार्या पिढीमुळे मॅक्लुस्कीगंजचे चित्र बदलत गेले. पोटापाण्याच्या शोधात नव्या पिढ्या बाहेर पडल्या. ज्येष्ठही काळाच्या पडद्याआड गेले. घरांना कोणी वाली राहिला नाही आणि त्यांचा मालकी हक्कातही बदल होत गेला. अजूनही पर्यटक आणि परकी पर्यटक दिसतात. काही ङ्गिरण्यासाठी येतात तर काही जण पूर्वजांची वस्ती पाहण्यासाठी येतात. एकीकाळी पर्यटकांमुळे गजबजलेला मॅक्लुस्कींगंज रेल्वे स्थानक आता ओस पडले आहे. पूर्वी अनेक एक्स्प्रेस गाड्या या ठिकाणाहून जात असत. आता कोरोना काळात काही रेल्वे बंद झाल्या आणि काही रेल्वेचा थांबा बदलला. आता काही लोकल रेल्वे या ठिकाणी थांबताना दिसतात.
कथाकारांना आणि चित्रपट निर्मात्यांना आकर्षण
मॅक्लुस्कीगंजचा परिसर बंगाली साहित्यिक आणि निर्मात्यांसाठी आवडीचे ठिकाण राहिलेले आहे. ‘अ डेथ इन द गंज’, अनटोल्ड स्टोरी (धोनीवर आधारित) आणि ‘डे वन’ सह अनेक चित्रपटांचे या ठिकाणी शूटिंग झाले आहे. बंगाली कादंबरीकार बुद्धदेव गुहा आणि अभिनेत्री अपर्णा सेन यांनी देखील मॅक्लुस्कीगंज येथे एक बंगला खरेदी केला होता. बुद्धदेव गुहा यांनी मॅक्लुस्कीगंज यावर लिहलेल्या बंगाली कादंबरीने तर या भागाला कोलकता आणि बंगालमधील पर्यटकांना आकर्षित केले. अभिनेत्री अपर्णा सेन यांनी आपला चित्रपट ‘36 चौरंगी लेन’ची पटकथा ही मॅक्लुस्कीगंज शहरापासून प्रेरित होत लिहली. 1997 मध्ये उपेक्षित परिसरात डॉन बॉक्सो अकादमीची स्थापन झाली तेव्हा स्थानिक लोकांच्या डोळ्यात आशेचा किरण निर्माण झाला. या शाळेत देशभरातून मुले शिकण्यासाठी येतात. शाळेचे स्वत:चे होॅस्टेल नसल्याने वसतीगृहाचा व्यवसाय वेगाने वाढला. या ठिकाणच्या स्थानिक लोकांसाठी हे रोजगाराचे मोठे माध्यम बनले. स्थानिक लोकांच्या मते, सध्या 75 पेक्षा अधिक वसतीगृह सुरू आहेत आणि जवळपास पाचशेपेक्षा अधिक कुटुंबांचा उदरनिर्वाह त्यावर सुरू आहे. डॉन बास्को शाळेच्या मुख्याध्यापिका जोशी टी.डी. म्हणतात, गेल्या 27 वर्षांत शहरात बराच बदल झाला आहे. अर्थात शिक्षणामुळे हे घडले आहे. या शाळेची स्थापना झाल्यामुळे स्थानिक लोकांना हॉस्टेल, खाण्यापिण्याच्या सामानाचे दुकान आणि दूध विक्री या माध्यमातून पोटापाण्याची सोय झाली. अँग्लो इंडियन कुटुंबातील अॅशले गोम्स यांचे पूर्वज 18 व्या शतकात ब्रिटनहून इथे आले. गोम्स यांचा जन्म मॅक्लुस्कीगंजचा. ते देखील एक वस्तीगृह चालवतात.
पर्यटकांसाठी विशेष ठिकाणं
या भागात येणार्या पर्यटकांसाठी निसर्गाच्या सानिध्यात असलेले विश्रामगृह चालविणारे दीपक राणा म्हणतात, गेल्या पाच दशकांत आपण या भागाचे चित्र बदलताना पाहिले. ते म्हणतात, विकासाचा मुद्दा येतो तेव्हा बदल होणे स्वाभाविक आहे. जंगलतोड होणार, घरदार होणार, नवीन रस्ते होत आहेत. सामाजिक बदल देखील झाला आहे. आता जुने वैभव येणे कठीण आहे. इतिहास शेवटी इतिहास आहे. आता भविष्याकडे लक्ष दिले पाहिजे. इतिहास आता संपला. सध्याच्या स्थितीत सुधारणा करण्यासाठी सरकारने पायाभूत सुविधांवर काही लक्ष दिले तर काही प्रमाणात बदल होऊ शकतो. परंतु कोणीच विकासासाठी पुढे आलेले नाही. मॅक्लुस्कीगंज येथील ज्येष्ठ पत्रकार गोपीचंद चौरसिया म्हणतात, आता या भागातील गौरवशाली इतिहास पुन्हा पाहवयास मिळणे कठीण आहे. ते म्हणतात या भागाला पूर्वी मिनी लंडन म्हटले जात होते. त्याकाळी 380 बंगले होते. परंतु या ठिकाणी रोजगार नसल्याने स्थानिक नागरिकांनी स्थलांतर केले. आता पाच ते सहा कुटुंबातील 42 ते 44 लोक राहतात. मॅक्लुस्कीगंजची अस्मिता हळूहळू जागृत होत आहे. परंतु मात्र पुनवैभव मिळणे कठीण आहे.
– कमलेश गिरी





