Rupali Chakankar : “11 वाजून 50 मिनिटांनी ‘तो’ मेल आला आणि….”; वैष्णवी प्रकरणामागचं काळं वास्तव उघड!

Rupali Chakankar । Vaishnavi Hagavane death case : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील तिची सासू, नवरा आणि नणंद यांना पोलिसांनी अटक केली असून, गेल्या सात दिवसांपासून फरार असणारा तिचा सासरा आणि दीराला देखील पोलिसांनी अटक केली आहे.
आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास बावधन पोलिसांनी अटकेची कारवाई करत पिता पुत्राला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी सापळा रचून अटकेची कारवाई केली आहे. मात्र हे दोघे बाप आणि मुलगा गेल्या सात दिवसांपासून कोठे गेले याची माहिती आता समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 मे रोजी वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केल्याची बातमी समोर आली. तिच्या वडिलांनी हगवणे कुटुंबावर गंभीर आरोप करत तिचा छळ करण्यात आल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
त्यानंतर पोलिसांनी वैष्णवीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हगवणे कुटुंबातील सासू, वैष्णवीचा पती शशांक आणि नणंद करिश्मा यांना अटक केली. यानंतर फरार असणाऱ्या सासऱ्याला आणि वैष्णवीच्या दीराला पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान, अश्यातच आज (दि. 23) राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी वैष्णवीच्या आई-वडिलांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी एक पत्रकार परिषदेत या संपूर्ण प्रकरणाबद्दल प्रतिक्रिया देत भूमिक मांडली.
वैष्णवी संदर्भात आयोगाकडे तक्रार नव्हती. पण आयोगाने स्वत स्युमोटो घेऊन या घटनेला वाचा फोडली. या प्रक्रियेत तपास अधिकाऱ्याने चांगला तपास केला आहे असे त्यांनी नमूद केलं.
यावेळी बोलताना रुपाली चाकणकर म्हणाल्या की, मला घटना समजल्यावर आयोगाच्या वतीने मी 19 तारखेला स्युमोटो दाखल केला होता. ती तक्रार बावधन पोलिसांकडे पाठवली होती. तक्रार दाखल झाली, त्यानंतर गुन्हाही नोंद झाला होता.
मी आज कस्पटे कुटुंबाशी बोलले. त्यांनी हगवणे कुटुंबाविरोधात अजून काही गुन्हे दाखल करा अशी मागणी केली आहे. त्यानुसार सप्लिमेंटरी गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत, असे चाकणकर यांनी सांगितलं.
आधई तीन आरोपी अटकेत होते, आज सासरे आणि दीर अशा 2 आरोपींना अटक केली आहे. पोलिसांची टीम कार्यरत असते. सायबर आणि क्राईमची टीमही सक्रिय होती. बाळा संदर्भातील घटनाक्रम किंवा यात काय घडलं, वैष्णवीच्या आईवडिलांच्या ताब्यात देण्यापूर्वीची माहिती दिली आहे.
ही घटना घडल्यापासून अनेक गोष्टी विचारल्या जातात. 6/11/2024 रोजी करिश्मा हगवणे यांनी राज्य महिला आयोगाला मेल केला होता. हा मेल होता रात्री पाठवलेला. 11 वाजून 50 मिनिटांनी मेल आला.
हा मेल आल्यावर पोलिसांना पाठवून त्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यांचे भाऊ, भावजय आणि घरातील लोकांच्या विरोधात तक्रार होती. असं देखील त्यांनी सांगितलं.
त्यानंतर 6 नोव्हेंबर 2024 रोजीच मयुरी हगवणेचा भाऊ मेघराज जगतापने आमच्याकडे तक्रार केली होती. ती तक्रार केल्यानंतर आम्ही त्यानुषंगाने 7 तारखेला 11.30 वाजता या दोन्ही तक्रारी बावधन पोलिसांना पाठवून कारवाई करण्यास सांगितलं. तक्रारदार आणि पोलिसांनाही पत्र पाठवलं होतं.
दि. 6 नोव्हेंबर रोजी 485 ची एफआयआर दाखल झाली होती. एक करिश्मा हगवणेची आणि दुसरी मेघराज जगताप यांचीही एफआयआर घेण्यात आल्या. बावधन पोलिसांनी या दोन्ही वेगवेगळ्या तक्रारी घेतल्या होत्या.
क्रॉस कम्प्लेंट होत्या. तक्रारदार हे कुटुंबातीलच असल्याने कौटुंबिकवाद कौन्सिलिंग करून मिटवले जाते. त्यानुसा कुटुंबातील लोकांना कौन्सिलिंगसाठी बोलावलं होत, असं त्यांनी सांगितलं.
आयोगाने स्वत: या घटनेला वाचा फोडली :
वैष्णवी संदर्भात आयोगाकडे तक्रार नव्हती. पण आयोगाने स्वत: स्युमोटो घेऊन या घटनेला वाचा फोडली. या प्रक्रियेत तपास अधिकाऱ्याने चांगला तपास केला आहे. या सर्व घटनेत अधिक गुन्हे दाखल करण्याची मागणी पालकांनी केली आहे. पोलिसांना तशा सूचना दिल्याचे चाकणकर म्हणाल्या.





