रुपाली चाकणकर अडचणीत? महिला नेत्या एकवटल्या अन् केली राजीनाम्याची मागणी; माधुरी मिसाळ मदतीला धावल्या, म्हणाल्या…

Madhuri Misal : राज्यात वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणावरून राज्य महिला आयोगावर टीका केली जात आहे. विरोधकांकडून आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. अशातच करुणा मुंडे यांनी देखील महिला आयोगाने निकाली काढलेल्या प्रकरणांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
तसेच महिला आयोग अध्यक्षांविरोधात सोशल मीडियावर पोस्ट लिहिली म्हणून कार्यकर्त्यांना धमकावण्याच्या सुपार्या दिल्या जात आहेत अशी पोस्ट राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या रोहिणी खडसे यांनी टाकली आहे.
दरम्यान राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याचा विषय अंतर्गत आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागाच्या विकास कामांचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
माधुरी मिसळ म्हणाल्या, राज्य महिला आयोगाचे काम कसे सुरू आहे यापेक्षा आज हगवणे कुटुंबाला न्याय देणे महत्त्वाचे आहे आणि राज्याचे गृह विभाग त्यांना न्याय मिळवून देईल असा विश्वास आम्हाला आहे, असं मिसळ म्हणाल्या.
तसेच रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असून ही त्यांची अंतर्गत बाब असल्याची प्रतिक्रिया नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी परभणीत दिली. मिसाळ यांनी काल (दि. २५) परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागाच्या विकास कामाची आढावा बैठक घेतली त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
महिला अध्यक्षांनी किती तक्रारींचा निपटारा केला
राज्यात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. करुणा मुंडे यांनी देखील आयोगाच्या अध्यक्षांबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. रुपाली चाकणकर या फक्त आपल्याकडे ३५००० महिलांच्या तक्रारी आल्याचे सांगत आहेत. मात्र, त्यातील किती तक्रारींचा निपटारा केला, याबाबत त्या सांगत नाहीत. मी देखील सहा कंप्लेंट करून त्यांनी माझ्या कंप्लेंटवर कोणतीही कारवाई केली नसल्याच्या आरोप करुणा मुंडे यांनी केला आहे.





