Bigg Boss 18 : ईशा सिंह आणि अविनाश मिश्रा ‘बिग बॉस १८’ च्या घरामध्ये त्यांच्या सुंदर केमिस्ट्रीसाठी ओळखले गेले आणि तेव्हापासून त्यांचे नाते नेहमीच चर्चेत आहे. आता ईशा आणि अविनाशच्या साखरपुड्याच्या चर्चांना जोर आला आहे, कारण दोघांनीही सोशल मीडियावर एक खास फोटो पोस्ट केला आहे. या जोडप्याचा हा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केल्यापासून व्हायरल होत आहे. मात्र, अद्याप ईशा आणि अविनाश यांनी त्यांच्या साखरपुड्याच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. या जोडीने पोस्ट केलेल्या एका फोटोने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या कथित जोडीने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्यांच्या हातात अंगठ्या दिसत आहेत, ज्यामुळे त्यांनी साखरपुडा उरकल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये ईशा आणि अविनाश एकमेकांचा हात धरलेले दिसत आहेत. Esha post दरम्यान, यापूर्वीही जेव्हा त्यांच्या साखरपुड्याच्या बातम्या आल्या होत्या, तेव्हा ईशा सिंगच्या आईने या केवळ अफवा असल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता तिच्या हातातील अंगठीने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. बिग बॉस १८ मध्ये अविनाश तिसरा रनर-अप ठरला होता, तर ईशा सहाव्या स्थानावर होती. शो संपल्यानंतरही या दोघांची मैत्री कायम असून त्यांनी अनेक म्युझिक व्हिडिओ आणि ट्रॅव्हल फोटोंच्या माध्यमातून चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. याशिवाय ईशा ‘नागिन ७’ मालिकेत झळकली होती. हेही वाचा: Sunetra Pawar : अजित पवारांच्या स्मृतींना वंदन करून सुनेत्रा पवारांकडून प्रचाराला सुरुवात…