Rule Change From 1 March : 1 मार्चपासून रेल्वे तिकीट बुकिंग ते UPI नियमांमध्ये होणार बदल; तुमच्या खिशावर होणार परिणाम
Rule Change From 1 March : आता जनरल तिकीट, प्लॅटफॉर्म तिकीट तसेच आरक्षण तिकीट-सर्व काही एकाच RailOne अॅपमध्ये उपलब्ध असेल.

Rule Change From 1 March : येत्या 1 मार्चपासून रेल्वे आरक्षणापासून ते UPI व्यवहाराशी संबंधित नियमात मोठा बदल होणार आहे. याशिवाय गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल दिसून येऊ शकतो. त्यामुळे साहजिकच याचा सामान्य माणसांच्या खिशावर परिणाम होऊ शकतो.
रेल्वे तिकीट बुकिंगचे नियम बदलले (Rule Change From 1 March)
रेल्वेने त्यांच्या तिकीट बुकिंग प्रणालीमध्ये मोठा बदल केला आहे, जो १ मार्चपासून अमलात येईल. आता जनरल तिकीट, प्लॅटफॉर्म तिकीट तसेच आरक्षण तिकीट-सर्व काही एकाच RailOne अॅपमध्ये उपलब्ध असेल. वेगवेगळी अॅप्स डाउनलोड करण्याची गरज उरणार नाही.
देशभरातील लाखो लोक दररोज मोबाईलद्वारे जनरल तिकिटे बुक करतात. त्यामुळे या बदलाचा सर्वाधिक परिणाम सामान्य प्रवाशांवर होणार आहे. सध्या अनेकांना UTS अॅप वापरण्यात अडचणी येत असल्याने त्यांना तिकिटांसाठी रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे 1 मार्चपासून जुनी UTS ॲप बंद होईल.
आता Rail One App मदतीने जनरल तिकीट, प्लॅटफॉर्म तिकीट याशिवाय तिकीट आरक्षण करता येईल. हे अॅप वापरणे अधिक सोपे आणि सोयीस्कर असेल. Rule Change From 1 March :
एलपीजी सिलेंडरची किंमत
एलपीजी सिलिंडरच्या किमतींमध्ये दरमहा बदल होतात. घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलिंडरसाठी नवीन दर १ मार्च रोजी जाहीर होण्याची अपेक्षा आहे. कच्च्या तेलाच्या किमतींनुसार हे दर वाढू किंवा कमी होऊ शकतात, ज्याचा थेट स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतींवर परिणाम होतो.
मात्र गेल्या काही महिन्यांपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. तर व्यावसायिक गॅसच्या किंमतीत चढउतार होताना दिसतो. Rule Change From 1 March :
UPI चा नवीन नियम
डिजिटल पेमेंट सहज होण्यासाठी 1 मार्चपासून अधिक सुरक्षा देण्यात येईल. UPI च्या माध्यमातून मोठी रक्कम पाठवताना अजून एक दोन टप्पे पार करावे लागतील. 1 मार्चपासून UPI PIN सह बायोमॅट्रिक व्हेरिफिकेशन, एक्सट्रा ऑथेंटिकेशन पूर्ण करावे लागेल. 1 मार्चपासून Average Monthly Balance महिन्याच्या सरासरीवर गृहीत धरण्यात येईल, याचा ग्राहकांना मोठा फायदा होईल.
सोशल मीडियाबाबत बदल
1 मार्चपासून व्हॉट्सॲप, टेलिग्राम सारख्या ॲपमध्ये बदल दिसून येईल. मॅसेजिंग ॲप्सवर नवीन सिम बायडिंगचा नियम लागू होईल. या नियमातंर्गत व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राम सारखे अॅप्स सक्रिय सिमशी लिंक केलेले असणे आवश्यक आहे. जर सिम लिंक केलेले नसेल तर ते अॅप्स वापरण्यायोग्य राहणार नाहीत. हे नियमन डिजिटल फसवणूक आणि बनावट खाती रोखण्यासाठी आहे.
बँकिंग नियम
बँकिंग आणि वित्त क्षेत्रातही बदल होण्याची शक्यता आहे. काही बँका किमान शिल्लक आवश्यकता बदलू शकतात किंवा बचत खात्याचे नियम अपडेट करू शकतात. याव्यतिरिक्त, ते UPI व्यवहारांसाठी साप्ताहिक क्रेडिट स्कोअर तपासणी किंवा अतिरिक्त सुरक्षा वैशिष्ट्ये, उदा: OTP किंवा मर्यादा बदल, सादर करू शकतात. याव्यतिरिक्त, काही बँका त्यांच्या क्रेडिट कार्डमध्ये देखील बदल करू शकतात, ज्यामध्ये रिवॉर्ड पॉइंट्स किंवा शुल्क समाविष्ट आहे.
Plane Crash : पैशांनी भरलेले विमान कोसळलं; रस्त्यावर पडलेल्या नोटा पाहून लोकांची उडाली झुंबड
सीएनजी आणि पीएनजी दर
स्वयंपाकाच्या गॅससोबतच, प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला सीएनजी आणि पीएनजीच्या दरांचाही आढावा घेतला जातो. नैसर्गिक गॅसच्या किमती १ मार्चपासून बदलू शकतात, ज्यामुळे तुमच्या कारच्या इंधनाच्या किमतीवर थेट परिणाम होईल आणि तुमच्या घराच्या बजेटवर भार वाढू शकतो.
जर किमती वाढल्या तर सीएनजी कार किंवा ऑटो रिक्षा चालकांना जास्त पैसे मोजावे लागतील, तर पीएनजी कनेक्शन असलेल्या घरांमध्ये स्वयंपाकाचा खर्चही वाढू शकतो. या बदलांचा परिणाम सामान्य माणसाच्या खर्चावर होईल.
हेही वाचा:







