आरटीओ परवान्यासंबंधी कामकाज दि.31 पर्यंत बंद
Updated On:

पुणे – प्रादेशिक परिवहन कार्यालयातील परवान्यासंबंधीचे कामकाज 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिली.
वाहन परवान्यासह इतर कामकाजासाठी आरटीओ कार्यालयात शेकडो नागरिक येतात. प्रादेशिक परिवहन कार्यालयात येणारे नागरिक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर एकाच ठिकाणी नागरिक जमा होत असल्याने खबरदारी म्हणून हे काम बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
दि.18 ते 31 मार्च या कालावधीत फक्त नवीन वाहन नोंदणी विषयक कामे आणि वाहन तपासणीचे काम सुरू राहणार आहे, असेही परिवहन अधिकारी शिंदे यांनी सांगितले.





