मोठा बदल..! ‘या’ लाडक्या बहिणींचे १५०० रुपये कायमचे बंद, सरकारचा धक्कादायक निर्णय

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. योजनेच्या पहिल्या वर्षपूर्तीनंतर सरकारने कठोर पाऊल उचलत तब्बल ८०,००० महिलांचे अर्ज बाद केले आहेत. यामुळे जालना, नागपूर, अमरावती आणि यवतमाळसह अनेक जिल्ह्यांतील हजारो महिलांना दरमहा मिळणारे १,५०० रुपये आता बंद होणार आहेत. या निर्णयाने अनेक लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसला आहे.
लाडकी बहीण योजनेचा लाभ केवळ पात्र महिलांनाच मिळावा यासाठी सरकारने कडक निकष लागू केले आहेत. आयकर विभाग आणि संबंधित यंत्रणांकडून अर्जांची कसून पडताळणी सुरू आहे.
राज्य सरकारने आर्थिक ताळेबंद राखण्यासाठी आणि योजनेचा लाभ खऱ्या गरजू महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. योजनेच्या सुरुवातीपासूनच २.४१ कोटी महिलांना लाभ मिळाला असून, यासाठी ४६,००० कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे. मात्र, अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी e-KYC आणि कागदपत्रांची कठोर तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना १ जुलै २०२४ रोजी सुरू झाली आहे. या योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा १,५०० रुपये देऊन सक्षम करणे हा आहे. आतापर्यंत लाखो महिलांना याचा लाभ मिळाला असला, तरी अपात्र अर्जांमुळे सरकारला हा कठोर निर्णय घ्यावा लागला.
या कारणांमुळे होतात अर्ज बाद
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास.
नमो शेतकरी महासम्मान निधी किंवा इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला.
कुटुंबातील कोणीही आयकर भरणारे किंवा सरकारी कर्मचारी असल्यास.
चुकीची किंवा अपूर्ण कागदपत्रे सादर केल्यास.
जिल्हानिहाय प्रभाव
या पडताळणी प्रक्रियेत अनेक जिल्ह्यांतील महिलांचे अर्ज बाद झाले आहेत.
जालना: एकूण ५,४२,३९२ अर्जांपैकी ५७,००० अर्ज बाद.
नागपूर: ३०,००० अर्ज प्राथमिक तपासणीत बाद.
अमरावती: २१,००० अर्ज बाद.
यवतमाळ: २७,००० अर्ज बाद.
या निर्णयामुळे या जिल्ह्यांतील हजारो महिलांना आर्थिक लाभापासून वंचित राहावे लागणार आहे.





