RR vs KKR : ‘इतना बुरा दिन आ गया…’, चाहत्याने मैदानात घुसून पायांना स्पर्श केल्याने रियान पराग ट्रोल, मीम्स होतायेत व्हायरल

RR vs KKR Riyan Parag trolled for meeting fan on the field : आयपीएल २०२५ चा सहावा सामना बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स खेळला गेला. या सामन्यात देखील एका चाहत्याने सुरक्षा रक्षकांचा घेरा भेदून मैदानात प्रवेश केला. त्या चाहत्याने राजस्थानचा कर्णधार रियान परागच्या पायाला स्पर्श केला. केकेआरच्या डावादरम्यान ही घटना घडली. त्यावेळी पराग गोलंदाजी करत होता. यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला मैदानाबाहेर नेले. मात्र, त्यानंतर रियान पराग सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.
पराग हा आसामचा खेळाडू –
आयपीएलच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये रियान पराग राजस्थान रॉयल्सचा कर्णधारही होता. संघाचे नेतृत्व संजू सॅमसनकडे असले तरी तो पूर्णपणे तंदुरुस्त नाही. म्हणूनच तो फक्त फलंदाज म्हणून खेळत आहे. त्याला एनसीएकडून विकेटकीपिंग करण्याची परवानगी मिळालेली नाही. या कारणास्तव फ्रँचायझीने रियान परागला कर्णधारपद दिले आहे. गुवाहाटी हे रियान परागचे होमग्राउंड देखील आहे. तो आसामकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो.
रियान पराग सोशल मीडियावर ट्रोल –
Fan invaded pitch for Riyan parag 😭😭
Itna bura din aagaya 😭 pic.twitter.com/FfI8coZnFH— CaLM dAdA (@CalmDada) March 26, 2025
जेव्हा चाहत्याने मैदानात प्रवेश केला आणि त्याचे पाय स्पर्श केले, तेव्हा रियान परागला ट्रोल केले जाऊ लागले. एका युजर्सने तर त्याच्यावर त्या चाहत्याला मैदानावर येण्यासाठी पैसे दिल्याचा आरोप केला. डॉ. निमो यादव २.० नावाच्या एका युजर्सने लिहिले की, “रियान परागने एका मुलाला मैदानात येऊन त्याच्या पाय स्पर्श करण्यासाठी १०,००० रुपये दिले.” त्याच वेळी, सागर नावाच्या एका युजर्सनी लिहिले, एका व्यक्तीने रियान परागबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्टेडियममधून बंदी घालण्याचा किंवा तुरुंगात जाण्याचा धोका पत्करला. तो केकेआरचा किती वेडा चाहता आहे.
So, Riyan Parag hired a boy and paid him 10,000 Rs to come onto the ground and touch his feet.
What an attention seeker this guy is!
#RRvsKKR pic.twitter.com/0w7gfW7lAC
— Dr Nimo Yadav 2.0 (@DrNimoYadav) March 26, 2025
Riyan Parag staging the security breach before match.
pic.twitter.com/zLniA0BjNY— Jahazi (@Oye_Jahazi) March 26, 2025
हेही वाचा – RR vs KKR : क्विंटन डी कॉकच्या अर्धशतकाच्या जोरावर KKR ने उघडले विजयाचे खाते, राजस्थानचा सलग दुसरा पराभव
६ सामन्यांमध्ये दोनदा घडली ही घटना –
आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत ६ सामने खेळले गेले आहेत आणि चाहते दोनदा मैदानात आले आहेत. पहिली घटना ईडन गार्डन्सवर केकेआर आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सलामीच्या सामन्यादरम्यान घडली, जेव्हा एक चाहता विराट कोहलीला भेटण्यासाठी मैदानात आला. त्या माणसाला अटक करण्यात आली. त्या चाहत्याला संपूर्ण आयपीएल हंगामात स्टेडियममध्ये प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.





