Yashasvi Jaiswal Record : पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत जैस्वालने रचला इतिहास! आयपीएलमध्ये केला खास पराक्रम, पाहा VIDEO
Yashasvi Jaiswal Record : या सामन्यात राजस्थानचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल याने एक अत्यंत दुर्मिळ आणि ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

Yashasvi Jaiswal Hits Six on 1st ball create record : आयपीएलच्या १९ व्या हंगामातील ४३ वा सामना जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानच्या संघाने २० षटकांत २२५ धावांचा मोठा डोंगर उभा केला. या सामन्यात राजस्थानचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने एक अत्यंत दुर्मिळ आणि ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर ठोकला षटकार –
दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाज मिचेल स्टार्क जेव्हा सामन्याचा पहिला चेंडू टाकण्यासाठी आला, तेव्हा यशस्वी जैस्वालने स्क्वेअर लेगच्या दिशेने एक जोरदार फटका मारून चेंडू थेट सीमारेषेबाहेर पाठवला. या षटकारासह जैस्वाल आयपीएलच्या इतिहासात सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारणारा केवळ पाचवा फलंदाज ठरला आहे. मात्र, मोठी खेळी करण्यात तो अपयशी ठरला आणि याच षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर तो स्टार्कलाच झेल देऊन बसला.
Welcome to #TATAIPL 2026, Mitchell Starc 💪
🎥 A strong response to being hit for a six first ball 🔥
Updates ▶️ https://t.co/6OOjzHtZiD#KhelBindaas | #RRvDC | @DelhiCapitals pic.twitter.com/jYWs4QtoBk
— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2026
यापूर्वी आयपीएलमध्ये चार खेळाडूंनी हा पराक्रम केला असून यशस्वी जैस्वाल पाचवा खेळाडू ठरला आहे. विशेष म्हणजे, टी-२० फॉरमॅटमध्ये डावाच्या पहिल्या चेंडूवर सर्वात जास्त वेळा षटकार मारण्याचा विक्रमही जैस्वालच्याच नावावर असून, त्याने तब्बल चौथ्यांदा हा पराक्रम केला आहे. या यादीत प्रियांश आर्या दोन वेळा डावाच्या पहिल्या चेंडूवर षटकार मारून दुसऱ्या स्थानावर आहे.
आयपीएल सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारणारे खेळाडू
- नमन ओझा (राजस्थान रॉयल्स) – विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (२००९, डर्बन)
- विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर) – विरुद्ध राजस्थान रॉयल्स (२०१९, कोलकाता)
- फिल सॉल्ट (कोलकाता नाईट रायडर्स) – विरुद्ध मुंबई इंडियन्स (२०२४)
- प्रियांश आर्य (पंजाब किंग्स) – विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (२०२५)
- शस्वी जैस्वाल (राजस्थान रॉयल्स) – विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (२०२६)
आयपीएल २०२६ मधील कामगिरी –
यंदाच्या आयपीएल हंगामात यशस्वी जैस्वालची कामगिरी सातत्यपूर्ण राहिली आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या १० सामन्यांत ३९ च्या सरासरीने ३१२ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या तीन शानदार अर्धशतकांचा समावेश आहे.





