Kyle Jamieson Celebration : वैभव सूर्यवंशीला बोल्ड केल्यानंतर काइल जेमिसनने गमावला संयम, सेलिब्रेशन पाहून येईल राग, पाहा VIDEO
Kyle Jamieson Celebration : काइल जेमिसनने वैभव सूर्यवंशीला आऊट केल्यानंतर केलेल्या आक्रमक जल्लोषाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Kyle Jamieson Aggressive Celebration against Vaibhav Sooryavanshi : आयपीएल २०२६ च्या एका महत्त्वपूर्ण सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या (RR) युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याची फलंदाजी दिल्ली कैपिटल्सविरुद्ध चालली नाही. या सामन्यात वैभव सूर्यवंशीकडे टी-२० क्रिकेटमध्ये १०० षटकार पूर्ण करण्याची सुवर्णसंधी होती. मात्र, वेगवान गोलंदाज काइल जेमिसनच्या अचूक यॉर्करसमोर त्याला माघारी फिरावे लागले. यानंतर काइल जेमिसनने आक्रमक सेलिब्रेशन केले, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
जेमिसनचा घातक चेंडू आणि आक्रमक जल्लोष –
या सामन्यात वैभव सूर्यवंशीने आपल्या डावाची सुरुवात पहिल्या चेंडूवर चौकार मारून केली होती. मात्र, पुढच्याच चेंडूवर जेमीसनने शानदार पुनरागमन करत एक अचूक यॉर्कर टाकला, जो सूर्यवंशीच्या बॅट आणि पॅडमधून थेट यष्टींवर आदळला. सूर्यवंशी पूर्णपणे चकित झाला. यानंतर जेमीसनने अत्यंत आक्रमक पद्धतीने आनंद साजरा करत सूर्यवंशीच्या डोळ्यात डोळे घालून टाळ्या वाजवल्या. दिल्लीच्या संपूर्ण संघाने हा जल्लोष केला, कारण सूर्यवंशीची आक्रमक फलंदाजी विरोधी संघांसाठी नेहमीच डोकेदुखी ठरते. सूर्यवंशीच्या नावावर सध्या ९९ टी-२० षटकार जमा आहेत.
An in-swinging yorker 😲🔥
🎥 Kyle Jamieson gets Vaibhav Sooryavanshi early 👊
Wait for the celebration 👀
Updates ▶️ https://t.co/6OOjzHtZiD#TATAIPL | #KhelBindaas | #RRvDC | @DelhiCapitals pic.twitter.com/6vxJ5ahlb3
— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2026
राजस्थानच्या डावाची खराब सुरुवात –
दिल्लीविरुद्धच्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. पहिल्याच षटकात यशस्वी जैस्वाल बाद झाला. त्याने मिचेल स्टार्कच्या पहिल्या चेंडूवर षटकार मारला, पण तिसऱ्या चेंडूवर स्टार्कने त्याला स्वतःच्याच गोलंदाजीवर झेलबाद केले. पहिल्याच षटकातील या धक्क्यानंतर राजस्थानचा संघ अडचणीत आला होता. मात्र, त्यानंतर कर्णधार रियान पराग आणि यष्टीरक्षक ध्रुव जुरेल यांनी संघाचा डाव सावरून पुढे नेला.
राजस्थानने दिल्लीसमोर ठेवले २२६ धावांचे लक्ष्य –
Innings break!
Riyan Parag and Donovan Ferreira sail #RR to 225/6 🔥
Will #DC chase it down? 🤔
Updates ▶️ https://t.co/6OOjzHtrt5#TATAIPL | #KhelBindaas | #RRvDC pic.twitter.com/uaXSEiwsF8
— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2026
राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्ससमोर २२६ धावांचे लक्ष्य ठेवले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या राजस्थानने २० षटकांत दोन गडी गमावून २२५ धावा केल्या. त्यांच्यासाठी रियान परागने सर्वाधिक ९० धावा केल्या. दरम्यान, डोनोव्हन फरेराने दोन चौकार आणि चार षटकारांसह १४ चेंडूंमध्ये नाबाद ४७ धावा केल्या.





