WI vs AUS : ‘आम्ही चूक केली तर लगेच कारवाई, पंचांच काय?’ वादग्रस्त निर्णयाने संतापलेल्या रोस्टन चेसने ICC ला विचारला प्रश्न

Roston Chase on Umpires Controversial Decision : वेस्टइंडीज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना बार्बाडोस येथे पार पडला. ऑस्ट्रेलियाने हा सामना १५९ धावांनी जिंकला. मात्र, हा कसोटी सामना संपण्यापूर्वीच चर्चेत आला. याचे कारण होते पंचांनी दिलेले वादग्रस्त निर्णय. ज्यावर आता वेस्टइंडीजचा कर्णधार रोस्टन चेसने पंचाच्या निर्णयासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याच्या मते आम्ही चूक केली तर लगेच कारवाई केली जाते, मग पंचांच्या बाबतीत असं का होत नाही?
सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत रोस्टन चेस म्हणाला की, जर खेळाडू मैदानावर कोणत्याही नियमाचा भंग करतात, तर त्यांच्यावर तात्काळ दंड आकारला जातो किंवा त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाते. परंतु जर पंच चुकीचा निर्णय देतात, तर त्यांच्याविरुद्ध कोणतीही कठोर कारवाई का केली जात नाही. त्यानी पुढे नमूद केले की, वेस्टइंडीज संघाने या कसोटी सामन्यात पूर्ण ताकदीने खेळ केला, परंतु पंचांच्या चुकीच्या निर्णयांमुळे त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरलं.
खेळाडूंवर कठोर कारवाई केली जाते, पण पंचांना अभय – रोस्टन चेस
Adrian holdstock probably the worst umpire of this generation… Roston Chase was given out despite a clear deviation. What a shame! @ICC please take some action about this. #WIvsAUS pic.twitter.com/5ORQlWe7WO
— Not Roudra (@Roy755384) June 26, 2025
रोस्टन चेसने आपला संताप व्यक्त करताना म्हटले की, “आम्हा खेळाडूंवर कठोर कारवाई केली जाते, पण पंचांना काहीच बोलले जात नाही. ते चुकीचे निर्णय देतात आणि त्यांचे आयुष्य पुढे चालू राहते. पण हे चुकीचे निर्णय आमच्या कारकीर्दीवर परिणाम करू शकतात. जसे की जर एखाद्या खेळाडूविरुद्ध वारंवार चुकीचे निर्णय दिले गेल्यास, त्याचा आत्मविश्वास आणि भविष्य दोन्हीवर परिणाम होतो. त्यामुळे पंचांच्या चुकीसाठीही काही शिक्षा किंवा कठोर नियम असणे आवश्यक आहेत.”
हेही वाचा – WI vs AUS : पॅट कमिन्सने रचला इतिहास; ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच कर्णधार
सामन्यादरम्यान थर्ड अंपायरने दिलेले वादग्रस्त निर्णय:
Caught or did the ball touch the ground? 🫣
Windies are furious with that decision. What’s your call? ☝️ or ❌#WIvAUS pic.twitter.com/6evBQGk7vq
— FanCode (@FanCode) June 26, 2025
- सॅम कॉन्स्टास वि. शमर जोसेफ (पहिली डाव): चेंडू पॅडवर लागला, ऑन-फील्ड अपील फेटाळली गेली. रिव्ह्यूमध्ये स्टंपला लागल्याचे दिसले आणि कॉन्स्टास ५ धावांवर बाद झाला.
- कॅमरुन ग्रीन वि. शमर जोसेफ (पहिली डाव): लो कॅच, थर्ड अंपायरने स्लिपमधील क्लीन कॅच मानला. ग्रीन ३ धावांवर बाद ठरला.
- ट्रेव्हिस हेड वाचला (पहिला डाव): अल्ट्राएजमध्ये बॅटचा किनारा स्पष्ट दिसत होता, पण थर्ड अंपायरने कॅ असंभाव्य मानला. हेड ५३ धावांवर होता, नंतर ६ धावा जोडल्या.
- रोस्टन चेस वि. हेझलवुड (दुसरा डाव) चेंडू पॅडवर लागला, पण बॅट-पॅड जवळ होती. थर्ड अंपायरने बॅट प्रथम लागल्याचे मानले. ऑन-फील्ड नॉट आउट निर्णय कायम राहिला.
- रोस्टन चेस वि. पॅट कमिन्स (दुसरा डाव): चेंडू खाली राहिला आणि पॅडवर लागला, हलका स्पाइक दिसला. थर्ड अंपायरने बॅट न लागल्याचे ठरवले, चेस ४४ धावांवर बाद झाला. असे अनेक वादग्रस्त निर्णय पाहायला मिळाले.





