WI vs AUS : पॅट कमिन्सने रचला इतिहास; ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच कर्णधार

Pat Cummins Creates History : ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजला तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीत १५९ धावांनी पराभूत केले. बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ३१० धावा केल्या आणि वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी ३०१ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ केवळ १४१ धावाच करू शकला. या विजयासह तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने १-० अशी आघाडी घेतली. या सामन्यात पॅट कमिन्सची गोलंदाजी फारशी प्रभावी ठरली नाही. तरीही, त्याने एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला.
वेस्ट इंडिजने पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला १८० धावांवर सर्वबाद करून सामन्यात पुनरागमनाचे संकेत दिले होते, परंतु ऑस्ट्रेलियाच्या तुफानी वेगवान गोलंदाजांनी वेस्ट इंडिजला १९० धावांवर रोखून आपल्या संघाला सामन्यात पुनरागमन करून दिले. ट्रॅव्हिस हेड, ब्यू वेबस्टर आणि अॅलेक्स कॅरी यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ३१० धावा केल्या. त्यानंतर वेस्ट इंडिजला १४१ धावांत सर्वबाद करून ऑस्ट्रेलियाने अवघ्या तीन दिवसांत विजयावर शिक्कामोर्तब केला.
पॅट कमिन्स ठरला जगातील पहिला कर्णधार –
Record Alert 🏏
Pat Cummins overtakes a legendary Aussie cricketer to script history in Barbados! 🌟
The Australian captain continues to shine with yet another milestone in his career.#PatCummins #AUSvsWI #CricketRecords #InShortNews pic.twitter.com/yyJw6xtZsA— Cricket -e- swag (@SunilManda507) June 27, 2025
या सामन्यात वेगवान गोलंदाजांचा दबदबा राहिला. वेस्टइंडीजच्या २० विकेट्सपैकी १४ विकेट्स वेगवान गोलंदाजांनी घेतल्आ. मात्र, पॅट कमिन्स आपल्या गोलंदाजीने फारशी छाप सोडू शकला नाही आणि त्याला केवळ ३ विकेट्स घेता आल्या. तरीही, या ३ विकेट्ससह पॅट कमिन्सने एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला. त्याने वेस्टइंडीजचा कर्णधार रोस्टन चेसला पहिल्या डावात बाद करताच त्याचे नाव इतिहासाच्या पानांवर नोंदले गेले. कमिन्स हा कसोटी क्रिकेटमध्ये १० प्रतिस्पर्धी कर्णधारांना बाद करणारा जगातील पहिला कर्णधार ठरला आहे.
हेही वाचा – WI vs AUS : जोश हेझलवुडचा भेदक मारा! ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजला तीन दिवसांत चारली धूळ
पॅट कमिन्सने त्याच्या कारकिर्दीत रोहित शर्माला सहा वेळा, डीन एल्गरला तीन वेळा, बेन स्टोक्स, टेम्बा बावुमा, क्रेग ब्रेथवेट आणि टिम साउदी यांना प्रत्येकी दोन वेळा, तसेच जो रूट, शान मसूद, जसप्रीत बुमराह आणि रोस्टन चेस यांना प्रत्येकी एक वेळा आउट केले आहे. विशेष म्हणजे, कमिन्सने गेल्या सहा सामन्यांमध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराला सहा वेळा बाद केले आहे.





