रोहित शर्माचा कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये जातानाचा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांनी व्यक्त केली चिंता

Rohit Sharma Video | भारताचा कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात तो कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये जात असल्याचे दिसत आहे. सोमवारी मध्यरात्रीचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांच्या मनात चिंता निर्माण झाली आहे.
व्हिडिओमध्ये रोहित शर्मा आपल्या गाडीतून उतरून रुग्णालयात जाताना दिसतो आहे. कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये जात असताना त्याला काही फोटोग्राफर्सने रोखण्याचा प्रयत्न केला. रोहित शर्माने त्यांना एक लूक दिला.
Rohit Sharma spotted in Kokilaben hospital Mumbai.❤️ pic.twitter.com/bQ6zTuixGc
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) September 8, 2025
यावेळी रोहित शर्माला विचारण्यात आले की, तो या हॉस्पिटलमध्ये कशासाठी आला आहे. त्यावेळी रोहित शर्माने फक्त त्यांच्याकडे पाहिले आणि तो तिथून हॉस्पिटलमध्ये निघून गेला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी “हिटमॅनला काही झालं का?” असे विचारले आहे. पण त्याला नेमकं काय झालं याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. Rohit Sharma Video |
काहींच्या मते, रोहित शर्माचे अंबानी कुटुंबियांशी घरगुती संबंध आहेत. गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मातोश्री कोकिलाबेन यांची प्रकृती खालावलेली आहे. त्यामुळे रोहित शर्मा हा कोकिलाबेन यांची विचारपूस करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेल्याचे म्हटले जात आहे, पण याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. Rohit Sharma Video |
हेही वाचा:
ShivSena : 2 आमदार सोडले तर…; दसऱ्यानंतर ठाकरेंना दणका? शिंदेंच्या शिलेदाराचा मोठा गौप्यस्फोट





