Rohit Sharma : रोहितच्या कृतीने जिंकली चाहत्यांची मनं! श्रेयसच्या ट्रॉफीसोबत केलं असं काही की…VIDEO होतोय व्हायरल

Rohit Sharma’s Video Viral in Award Function : टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा सध्या चर्चेत आहे. नुकतेच त्याचे शिवाजी पार्क येथील सरावाचे व्हिडीओ व्हायरल झाले असून, तो आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जोरदार तयारी करत असल्याचे दिसत आहे. याच दरम्यान, 7 ऑक्टोबर रोजी मुंबईत झालेल्या सीएट क्रिकेट रेटिंग पुरस्कार सोहळ्यातील एका व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या व्हिडीओत रोहितने दाखवलेल्या संवेदनशील कृतीमुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पुरस्कार सोहळ्यातील रोहितची संवेदनशीलता –
सीएट क्रिकेट रेटिंग पुरस्कार सोहळ्यात रोहित शर्मासह केन विलियम्सन, ब्रायन लारा, टेम्बा बावुमा, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन यांसारखे आंतरराष्ट्रीय दिग्गज खेळाडू उपस्थित होते. या सोहळ्यात रोहित शर्माला चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील विजेत्या भारतीय संघाचा कर्णधार म्हणून विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
The award that Shreyas Iyer received, he placed it down on the floor, but as soon as Rohit Sharma noticed it, he immediately picked it up and placed it back on the table.🥹❤️
Rohit knows the true value of every award and trophy.🫡 pic.twitter.com/5CL6kQBXPr
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) October 12, 2025
तसेच, श्रेयस अय्यरला चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून पुरस्कार मिळाला. या सोहळ्यात रोहित आणि श्रेयस एकाच टेबलवर शेजारी बसले होते. पुरस्कार स्वीकारल्यानंतर श्रेयसने आपली ट्रॉफी खुर्चीजवळ जमिनीवर ठेवली. हे पाहून रोहितने ती ट्रॉफी उचलून टेबलवर ठेवली, जेणेकरून तिला पाय लागणार नाही. पुरस्काराबद्दलचा हा आदर दाखवणारा क्षण व्हायरल झाला असून, चाहत्यांकडून रोहितचे कौतुक होत आहे.
हेही वाचा – Cricketer Died : धक्कादायक! सामना जिंकला पण जीव गमावला; विजयाचा जल्लोष करताना हृदयविकाराचा झटका, पाहा VIDEO
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहित सज्ज –
भारतीय वनडे आणि टी-20 संघ लवकरच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. 19 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात वनडे आणि टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. कसोटी आणि आंतरराष्ट्रीय टी-20 मधून निवृत्ती घेतलेले रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची वनडे मालिकेसाठी निवड झाली आहे. मात्र, निवड समितीने मोठा निर्णय घेत रोहितला वनडे कर्णधारपदावरून हटवले आणि शुबमन गिल ला वनडे संघाचा कर्णधार नेमले आहे. आता19 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वनडे मालिकेत रोहित आणि विराट शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसतील.





