Rohit Sharma : ‘हो, मी २०२७ चा विश्वचषक खेळणार…’, रोहितने खास चाहत्याला दिला शब्द, VIDEO होतोय व्हायरल

Rohit Sharma Viral Video : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माने आपल्या वनडे क्रिकेट कारकिर्दीवरून सुरू असलेल्या सर्व अटकळांना पूर्णविराम दिला आहे. त्याने स्पष्ट केले की, तो 2027 चा वनडे विश्वचषक खेळण्यास इच्छुक आहे आणि त्यासाठी पूर्णपणे तयार आहे. मेक-ए-विश फाउंडेशनच्या एका मुलांशी संवाद साधताना चाहत्याला दिलेल्या या शब्दाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रोहितने लहान चाहत्याला दिला शब्द –
सप्टेंबर महिन्यात मुंबईत मेक-ए-विश फाउंडेशनच्या मुलांशी भेटीवेळी रोहितने हा वादा केला. एका लहान चाहत्याने त्याला विचारले की, तो पुढील विश्वचषकापर्यंत खेळणार का? यावर हसतमुखाने रोहित म्हणाला, “हो, नक्कीच! मी पूर्ण मेहनत करेन आणि भारताला ट्रॉफी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन.” या उत्तराने चाहत्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.
रोहितच्या नेतृत्वाची झलक –
View this post on Instagram
रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2023 च्या वनडे विश्वचषकात अंतिम फेरी गाठली होती, परंतु ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर त्याच्या कर्णधारपदावर आणि भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मात्र, त्यानंतर रोहितने 2024 चा टी-20 विश्वचषक आणि 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले. या दोन मोठ्या विजयांनी भारतीय संघाचा आत्मविश्वास पुन्हा उंचावला आणि रोहितच्या नेतृत्वाला नव्याने बळ मिळाले.
हेही वाचा – Mohammed Shami : ‘त्यांना जे बोलायचे ते बोलू द्या…’, शमीने फेटाळला आगरकरांचा दावा; म्हणाला, माझी गोलंदाजी…
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर विराट-रोहितची कसोटी –
आता रोहित शर्मा आणि विराट कोहली चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर पहिल्या वनडे मालिकेसाठी सज्ज झाले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 19 ऑक्टोबरपासून सुरू होणारी ही तीन सामन्यांची मालिका 2027 च्या विश्वचषकाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्रेव्हिस हेडनेही नुकतेच म्हटले आहे की, रोहित आणि कोहली 2027 च्या विश्वचषकापर्यंत भारतीय संघाचा भाग राहतील.
नव्या युगाची सुरुवात –
भारतीय निवड समितीने शुबमन गिलला वनडे संघाचे कर्णधारपद देऊन नव्या युगाची सुरुवात केली आहे. तरीही, रोहित आणि कोहली यांचा अनुभव हा संघाचा कणा मानला जातो. परदेशी दौऱ्यांवर या दोन्ही ज्येष्ठ खेळाडूंची भूमिका युवा खेळाडूंना मार्गदर्शन करण्यात महत्त्वाची ठरणार आहे.
हेही वाचा – Afghanistan vs Pakistan War : धक्कादायक! पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात अफगाणिस्तानचे तीन क्रिकेटपटू ठार
रोहितची फिटनेसवर मेहनत –
रोहित शर्मा सध्या आपल्या फिटनेसवर विशेष लक्ष देत आहे. त्याने माजी सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्यासोबत प्रशिक्षण घेऊन 10 किलो वजन कमी केले आहे. आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर चाहत्यांच्या नजरा पुन्हा एकदा रोहितवर खिळलेल्या असतील. कारण, कर्णधाराने स्वतःच जाहीर केले आहे, “मी 2027 चा विश्वचषक नक्की खेळणार!”





