रोहित शर्माची कसोटी कारकीर्द संपली? सिडनीमध्ये फेअरवेल मॅचही खेळायला मिळणार नाही?

Rohit Sharma Sydney Test: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माबाबत मोठी बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात रोहित प्लेइंग इलेव्हनचा भाग असणार नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रोहितने शेवटचा कसोटी सामना मेलबर्नमध्ये खेळला आहे. भारतीय कर्णधाराला क्रिकेटच्या प्रदीर्घ फॉरमॅटमध्ये फेअरवेल मॅच खेळण्याची संधीही मिळणार नाही. कांगारूंच्या भूमीवर कामगिरीने हिटमॅनने निराशा केली आहे. रोहितने या दौऱ्यावर आतापर्यंत खेळल्या गेलेल्या पाच डावांमध्ये 6.20 च्या माफक फलंदाजीच्या सरासरीने केवळ 31 धावा केल्या आहेत. फलंदाजीत अपयशी होण्यासोबतच रोहितच्या कर्णधारपदावरही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. रोहितचे मैदानावरील अनेक निर्णय टीम इंडियाच्या पराभवाचे कारण ठरले आहेत.
रोहितला फेअरवेल मॅच मिळणार नाही –
रोहित शर्माला त्याच्या कसोटी कारकिर्दीचा शेवट करण्यासाठी फेअरवेल मॅच मिळणार नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे होणाऱ्या पाचव्या कसोटी सामन्यात रोहित प्लेइंग इलेव्हनचा भाग असणार नाही. हिटमॅनने शेवटची कसोटी भारताच्या पांढऱ्या जर्सीमध्ये मेलबर्नमध्ये खेळली आहे. रोहितच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह पाचव्या कसोटीत संघाची कमान सांभाळू शकतो.
चौथ्या कसोटीत ओपनिंगला आलेला रोहित दोन्ही डावात खराब फ्लॉप झाला. पहिल्या डावात भारतीय कर्णधाराच्या बॅटमधून केवळ 3 धावा झाल्या होत्या आणि तो अतिशय खराब शॉट्स खेळून पॅव्हेलियनच्या दिशेने गेला होता. दुसऱ्या डावातही हिटमॅनची अवस्था अशीच होती. 40 चेंडू खेळूनही रोहित केवळ 9 धावा करून बाद झाला.
कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह –
रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने खेळल्या गेलेल्या सहा कसोटी सामन्यांपैकी पाच सामने गमावले आहेत. पहिल्यांदाच भारतीय संघाला घरच्या भूमीवर न्यूझीलंडविरुद्ध 3-0 असा पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर ॲडलेडमध्ये गुलाबी चेंडूने खेळल्या गेलेल्या कसोटीत टीम इंडियाचा कांगारूंकडून पराभव झाला. गाब्बा कसोटी ड्राॅ ठेवण्यात भारतीय संघ कसा तरी यशस्वी ठरला, तर मेलबर्नमध्ये फलंदाजांच्या लाजिरवाण्या कामगिरीमुळे संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.
चौथ्या कसोटीत प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केल्यामुळे रोहितवर जोरदार टीका झाली. भारतीय कर्णधाराने फलंदाजीच्या क्रमातही फेरबदल केले होते आणि राहुलच्या जागी तो स्वत: ओपनिंगला आला होता. रोहितचा हा निर्णय पूर्णपणे संघाच्या विरोधात होता. रोहित केवळ सलामीवीर म्हणून फ्लॉप ठरला नाही, यासोबतच तिसऱ्या क्रमांकावर असलेला केएल राहुलही धावांसाठी तळमळत होता. गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातील बदलाबाबतही माजी क्रिकेटपटूंनी रोहितवर टीका केली होती.
❗️ No farewell Test Match For Rohit Sharma ❗️ pic.twitter.com/W7ZclJietB
— Vaibhav Bhola 🇮🇳 (@VibhuBhola) January 2, 2025
रोहित शर्माची कसोटी क्रिकेट कारकीर्द –
37 वर्षीय रोहित शर्माच्या कसोटी क्रिकेट करिअरची सुरुवात 6 नोव्हेंबर 2013 रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध ईडन गार्डन येथे झाली. तेव्हापासून, त्याने भारतासाठी 67 सामने खेळले आहेत ज्यात त्याने 40.57 च्या सरासरीने 4301 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 12 शतके आणि 18 अर्धशतके झळकावली आणि 212 धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या होती. रोहित शर्माने 24 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आणि भारताने 12 सामने जिंकले, 9 सामने गमावले आणि 3 सामने अनिर्णित राहिले. त्याच्या नेतृत्वाखाली भारताची विजयाची टक्केवारी 57.14 होती.
दरम्यान, भारतीय कसोटी संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माने सिडनी कसोटी सामन्याच्या एक दिवस आधी एक मोठा निर्णय घेतला आणि स्वतःला कसोटीतून बाहेर काढले. मेलबर्न कसोटी सामना रोहित शर्माचा शेवटचा कसोटी सामना होता. रोहितने अद्याप निवृत्तीची घोषणा केली नसली तरी ज्याप्रकारे परिस्थिती निर्माण होत आहे त्यावरून या कसोटी मालिकेनंतर तो निवृत्ती घेईल असे म्हंटले जात आहे.





