India vs Australia 5th Test: टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये होणार मोठा बदल, 2 खेळाडूंचा प्रवेश जवळपास निश्चित, संभाव्य टीम पहा

India vs Australia 5th Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवी कसोटी सिडनी येथे खेळवली जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांचे खेळाडू जोरदार सराव करत आहेत. दोन्ही संघांना हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकायचा आहे. जर टीम इंडिया हा सामना हरला तर त्यांच्यासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचे दरवाजे जवळपास बंद होतील. आता सिडनी कसोटी जिंकून टीम इंडियाला WTC फायनलच्या शर्यतीत राहायचे आहे. शेवटच्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्येही बदल होणार आहे.
शुभमन गिल दाखल होणार –
मेलबर्न कसोटीत शुभमन गिल खेळवला गेला नव्हता. यानंतर रोहित शर्माच्या या निर्णयावर अनेक प्रश्न उपस्थित झाले आणि केएल राहुल नंबर-3 वर फलंदाजी करताना दिसला. आता शुभमन गिल सिडनी कसोटीत खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. आज तो सरावाच्या वेळीही दिसला. आता सिडनी कसोटीसाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये गिलचा समावेश होण्याची शक्यता आहे. तर रोहित शर्मा खेळणार की नाही याबाबत अद्याप संभ्रम आहे.
Shubman Gill just got a fist pump, pat on the back from Gautam Gambhir and Jasprit Bumrah shook his hand after that. He is now doing fielding drills but with the lot which has been mostly on the bench this tour. Kohli, NKR, Jaiswal, KL and Pant in a separate group pic.twitter.com/p9bS3DmHUE
— Sahil Malhotra (@Sahil_Malhotra1) January 2, 2025
आकाश दीप सिडनी कसोटीतून बाहेर –
वेगवान गोलंदाज आकाश दीप सिडनी कसोटीतून बाहेर पडला आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी पत्रकार परिषदेत त्याच्या दुखापतीबाबत माहिती दिली. आत्तापर्यंत आकाश दीपने या मालिकेत दोन सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 80 पेक्षा जास्त ओव्हर टाकल्या आहेत. या काळात त्याने पाच विकेट्सही घेतल्या. आता आकाश दीप सिडनी कसोटीतून बाहेर पडल्यानंतर प्रसिध कृष्णा किंवा हर्षित राणा या दोघांना संधी मिळू शकते. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये हर्षित राणा खेळताना दिसला होता. अशा परिस्थितीत आता प्रसिध कृष्णाची सिडनी कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड होण्याची शक्यता आहे.
🚨 AKASHDEEP RULED OUT OF THE SYDNEY TEST MATCH…!!! 🚨 pic.twitter.com/GRsmF4jyT8
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 2, 2025
टीम इंडियाचे संभाव्य प्लेइंग 11 –
यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा..





