Rohit Sharma : हिटमॅनला आयुष्यात कोणत्या गोष्टीचा आहे पश्चात्ताप? स्वत:च केला खुलासा, पाहा VIDEO

Rohit Sharma says no regrets in life : रोहित शर्माने टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो सध्या फक्त एकदिवसीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाचे नेतृत्त्व करत आहे. अशात त्याला विचारण्यात आले की, त्याला आयुष्यात कोणत्या गोष्टीचा पश्चाताप आहे, तेव्हा त्यानी सांगितले की, त्याला जीवनात कोणत्याही गोष्टीचा पश्चाताप नाही. त्यानी पुढे म्हटले की, २५ वर्षांपूर्वी त्यांच्याकडे काय होते आणि आज त्यानी काय काय मिळवले आहे.
रोहितचे म्हणणे आहे की, जे काही नशिबात लिहिले आहे, तेच घडत आहे आणि त्यामुळे तो समाधानी आहे. त्याला कोणत्याही गोष्टीचा पश्चाताप नाही. रोहित शर्माने भारताला आतापर्यंत दोन आयसीसी ट्रॉफी जिंकून दिल्या आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला २०२३ च्या विश्वचषक अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता.
आयुष्यात कोणत्याही गोष्टीचा पश्चात्ताप नाही – रोहित शर्मा
Such a beautiful and motivational lines by Rohit Sharma. ❤️ pic.twitter.com/cFUUxUlI3m
— 𝐉𝐨𝐝 𝐈𝐧𝐬𝐚𝐧𝐞 (@jod_insane) June 21, 2025
रोहित शर्माने हरभजन सिंग आणि गीता बसरा यांच्या ‘हू इज द बॉस?’ या शोमध्ये सांगितले, “मला अनेकदा मुलाखतींमध्ये विचारले गेले की, तुम्हाला आयुष्यात कशाचा पश्चात्ताप आहे? मी पण त्यांना नेहमी विचारले आहे, कशाचा पश्चात्ताप? जर मी २५ वर्षे मागे गेलो, तर मला माहीत आहे की मी कुठे होतो आणि माझे आयुष्य कसे होते. मला खूप आनंद आहे की देवाने मला हे सर्व दिले आहे. मी कधीच विचार केला नव्हता की मी या सर्व पुरस्कारांसह आणि इतर गोष्टींसह इथे बसलेलो असेन. तुम्हाला फक्त तेच मिळते जे तुमच्या नशिबात लिहिलेले आहे. हे माझ्या नशिबात लिहिले होते आणि मी यामुळे खूप समाधानी आहे.”
हेही वाचा – IND vs ENG : जैस्वालच्या चुकीमुळे टीम इंडिया अडचणीत, गावस्करांनी सुनावले खडेबोल!
रोहित शर्माच्या कारकीर्दीतील यश –
रोहित शर्माने २००७ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये नाव कमावले होते आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याला पदार्पणाची संधी मिळाली. विराट कोहलीच्या आधीच त्यांनी भारतासाठी खेळण्यास सुरुवात केली होती आणि २००७ च्या टी-२० विश्वचषक विजेत्या संघाचा ते भाग होता. कर्णधार म्हणूनही तो यशस्वी ठरला आहे. त्यानी भारताला दोन आशिया चषक, एक टी-२० विश्वचषक आणि एक चॅम्पियन्स ट्रॉफी यांच्यासह अनेक मालिका जिंकून दिल्या आहेत. आयपीएलमध्येही त्यानी पाच ट्रॉफी जिंकणारा पहिला कर्णधार होण्याचा मान मिळवला. नंतर धोनीने त्याच्या या विक्रमाशी बरोबरी केली.





