IND vs AUS : किंग कोहलीसमोर हिटमॅन नतमस्तक! रोहितने सलाम करताच विराटचे स्मितहास्य, पाहा VIDEO

Virat Rohit Video Viral ahead IND vs AUS ODI Series : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. या दौऱ्यात संघ तीन वनडे आणि पाच टी-20 सामने खेळणार आहे. मालिकेची सुरुवात 19 ऑक्टूबरपासून होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली पहिल्यांदाच भारतीय संघाकडून खेळताना दिसणार आहेत. आयपीएल 2025 नंतर हे दोन दिग्गज खेळाडू प्रथमच स्पर्धात्मक क्रिकेट खेळणार आहेत. दोघांनी यापूर्वी कसोटी आणि टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
रोहित-विराटचा व्हिडीओ व्हायरल –
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी दिल्लीत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत रोहित शर्मा बसकडे जात असताना विराट कोहलीला पाहतो, यानंतर तो पटकन त्याला साधेपणाने वाकून नमस्कार करतो. त्यानंतर बसच्या आत बसलेल्या विराटने याला हसतमुखाने प्रतिसाद दिला. हा व्हिडीओ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून शेअर केला आहे. या व्हिडीओत संघातील इतर खेळाडूही दिसत आहेत.
भारतीय खेळाडूंचा प्रवास –
𝙀𝙣 𝙧𝙤𝙪𝙩𝙚 𝘿𝙤𝙬𝙣 𝙐𝙣𝙙𝙚𝙧 ✈️
Of familiar faces and special reunions as #TeamIndia depart for the Australia challenge 😍#AUSvIND pic.twitter.com/ElV3OtV3Lj
— BCCI (@BCCI) October 15, 2025
विराट कोहली आपल्या कुटुंबासोबत लंडन येथून दिल्लीत दाखल झाला, तर रोहित शर्मा मुंबईहून दिल्लीत आला. श्रेयस अय्यरही संघात सामील होऊन ऑस्ट्रेलियाला रवाना झाला. संघातील इतर खेळाडू यापूर्वीच दिल्लीत होते आणि सर्व खेळाडू आता दिल्लीहून ऑस्ट्रेलियाला रवाना झाले आहेत.
हेही वाचा – Indian Womens Team : भारतीय महिला संघाला आयसीसीचा दणका! ‘या’ कारणासाठी ठोठावला दंड
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेचे वेळापत्रक :
- पहिला वनडे : 19 ऑक्टोबर, पर्थ
- दुसरा वनडे : 23 ऑक्टोबर, अॅडलेड
- तिसरा वनडे : 25 ऑक्टोबर, सिडनी
वनडे मालिकेसाठी भारतीय संघ :
शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), यशस्वी जैस्वाल, अक्षर पटेल, नीतीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक).





