Rohit Last ODI : रोहित शर्मा आणि बीसीसीआय अधिकाऱ्यांच्या बैठकीत काय घडलं? आतल्या गोष्टी आल्या समोर
Rohit Last ODI : इंग्लंड दौऱ्यातील लॉर्ड्स येथे रविवारी होणारा सामना हा रोहितच्या कारकिर्दीतील शेवटचा वनडे सामना ठरण्याची शक्यता आहे.

Rohit Sharma Last ODI Reports after IND vs ENG Lords ODI Yashasvi Jaiswal : भारतीय क्रिकेटचा संघाचा माजी कर्णधार आणि ‘हिटमॅन’ म्हणून प्रसिद्ध असलेला रोहित शर्माच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या अंताची धक्कादायक बातमी समोर येत आहे. कसोटी आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आधीच निवृत्त झालेला ३९ वर्षीय रोहित आता केवळ एकदिवसीय क्रिकेट खेळत आहे.
मात्र, चालू असलेल्या इंग्लंड दौऱ्यातील लॉर्ड्स येथे रविवारी होणारा सामना हा रोहितच्या कारकिर्दीतील शेवटचा वनडे सामना ठरण्याची शक्यता आहे. २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत रोहितचे वय ४० पार होणार असल्याने, निवड समिती आणि संघ व्यवस्थापन युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालला संधी देण्याच्या विचारात आहे.
रोहित शर्मा निर्णयावर नाराज; गंभीरसोबत झाली बैठक –
That uncle from the Indian support staff saying “𝗧𝗵𝗮𝗻𝗸 𝗬𝗼𝘂” to Rohit Sharma as he headed to Lord’s for the final ODI. 😭
– You can clearly see the pain hidden behind Hitman’s smile. 😥 #indvsengodi #rohitsharma #indiateam #gambhir #last pic.twitter.com/nHeUeuM4Pl
— Cricket Updates (@arman7590) July 17, 2026
द इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तानुसार, चालू वनडे मालिकेदरम्यान रोहित शर्माने बीसीसीआय अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. रोहित या निर्णयावर अत्यंत नाराज असल्याचे समजते. निवड समितीने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्यासोबत मिळून गेल्या आठवड्यात रोहितशी सविस्तर चर्चा केली आणि बोर्ड आता त्याच्यापुढचा विचार करत असल्याचे त्याला स्पष्ट शब्दांत सांगितले.
बीसीसीआयचा स्पष्ट निरोप; निवड होणार नाही –
🚨 A BIG UPDATE ON ROHIT SHARMA 🇮🇳
– Lord’s ODI could be Rohit Sharma’s last match for India. [Devendra Pandey]
Selectors has informed that Rohit isn’t in plans for 2027 World Cup. pic.twitter.com/r6rOPdDTTv
— Johns. (@CricCrazyJohns) July 16, 2026
बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “निवड समितीने आता एकदिवसीय सामन्यांसाठी रोहित शर्माची निवड न करण्याचा निर्णय घेतला आहे. जर रोहितला आदराने निवृत्ती घ्यायची असेल किंवा लगेच निवृत्ती जाहीर करायची नसेल, तर तो त्याचा वैयक्तिक निर्णय असेल. मात्र, रविवारी लॉर्ड्सवर होणाऱ्या सामन्यानंतर सिलेक्टर्स त्याला वनडे टीममध्ये स्थान देणार नाहीत, हा निरोप त्याला स्पष्टपणे देण्यात आला आहे.”
२०२६ मधील सुमार कामगिरी ठरली कारण?
VIRAT KOHLI REACTION SAY IT ALL 🥹
– Looks like Virat Kohli and Jasprit Bumrah also knew about Rohit Sharma’s retirement news, which is why they looked sad. 💔 #indvseng #rohitsharma #viratkohli #gambhir pic.twitter.com/Ikdbdrt2bl
— Cricket Updates (@arman7590) July 16, 2026
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने २०२५ च्या सुरुवातीला चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले होते, मात्र त्यानंतर त्याला कर्णधारपदावरून हटवण्यात आले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील शतकानंतर दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि आता इंग्लंडविरुद्ध रोहितला मोठी खेळी करता आलेली नाही. २०२६ मध्ये खेळलेल्या ८ एकदिवसीय सामन्यांमध्ये रोहितला केवळ ३० च्या सरासरीने २४१ धावा करता आल्या आहेत, ज्यामुळे बोर्डाने हा कठोर निर्णय घेतला आहे.





