Rohit Sharma : रोहित शर्माला मोठा झटका ! ‘या’ खेळाडूची वनडे रॅकींगमध्ये अव्वल स्थानी झेप

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि ‘हिटमॅन’ म्हणून ओळखला जाणारा रोहित शर्मा याला आयसीसी वनडे फलंदाजांच्या क्रमवारीत मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंडचा आक्रमक फलंदाज डेरिल मिचेलने रोहितला मागे टाकत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. साऊथ आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला 30 नोव्हेंबर 2025 पासून सुरुवात होणार असताना रोहितला हा झटका बसला आहे.
रोहित शर्मा याने आपला शेवटचा वनडे सामना 9 मार्च 2025 रोजी खेळला होता. त्यानंतर तब्बल सात महिन्यांनी ऑक्टोबर 2025 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पुनरागमन केले. इतक्या मोठ्या विश्रांतीनंतरही रोहितने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन वनडे मालिकेत त्याने पहिल्या सामन्यात 8 धावा, दुसऱ्या सामन्यात 73 धावांची अर्धशतकी खेळी आणि तिसऱ्या सामन्यात नाबाद 121 धावांचे शतक ठोकले. या दमदार कामगिरीमुळे तो बराच काळ वनडे फलंदाजांच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थानी होता.
मात्र आता न्यूझीलंडचा स्टार ऑलराऊंडर डेरिल मिचेलने वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत 119 धावांची शानदार शतकी खेळी साकारली. या खेळीच्या जोरावर त्याला 36 रेटिंग पॉइंट्स मिळाले आणि तो 746 वरून थेट 782 गुणांवर पोहोचला. परिणामी, तो आता आयसीसी वनडे फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.डेरी मिचेलने पहिले स्थान गाठल्यानंतर आता रोहित शर्माची दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. रोहित शर्माच्या नावावर सध्या 781 गुण आहेत तर डेरी मिचेल 782 गुणांसह अव्वल स्थानी आहे.
आता साऊथ आफ्रिका दौऱ्यात रोहित शर्मा कशी कामगिरी करतो आणि पुन्हा अव्वल स्थान पटकावतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. भारतीय चाहत्यांच्या अपेक्षा रोहितकडून मोठ्या आहेत आणि हा धक्का त्याला आणखी प्रेरणा देऊन मैदानात आग ओकण्यास भाग पाडेल, अशी आशा आहे.





