Rohit Sharma : ‘ये क्या है…’, वानखेडेवरील कार्यक्रमानंतर रोहित शर्मा धाकट्या भावावर संतापला, पाहा VIDEO

Rohit Sharma scolds his younger brother video viral : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा दिग्गज फलंदाज रोहित शर्माला आज विशेष सन्मान मिळाला. मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) वानखेडे स्टेडियमच्या डिवेचा पॅव्हेलियन लेव्हल ३ येथे ‘रोहित शर्मा स्टँड’चे भव्य उद्घाटन केले. या कार्यक्रमाला रोहित शर्मा आपल्या कुटुंबासह उपस्थित होता. या कार्यक्रमानंतर रोहित शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो धाकटा भाऊ विशालवर रागावलेला दिसत आहे.
रोहित शर्मा धाकट्या भावावर का संतापला –
१६ मे रोजी सायंकाळी ४ वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नीता अंबानी आणि इतर अनेक प्रसिद्ध व्यक्तींच्या उपस्थितीत रोहित शर्माच्या नावाच्या स्टँडचे उद्घाटन करण्यात आले. स्टँडच्या उद्घाटनानंतर, रोहित शर्मा त्याच्या पालकांना सोडण्यासाठी गाडीपर्यंत पोहोचला. यावेळी त्याला गाडीवर ओरखडा दिसला, ज्यामुळे तो रागवला. याबाबत त्याने त्याचा धाकटा भाऊ विशाल शर्माला विचारले की हे काय आहे?
Rohit Sharma to his brother – Yeh kya hai ,after spotting car damage🤣😭
— Rohan💫 (@rohann__45) May 16, 2025
रोहित शर्मा भावावर रागवल्याचा व्हिडीओ व्हायरल –
हे विचारताना रोहित शर्माचा पारा चढलेला दिसला. त्यामुळे रोहितच्या विचारण्याच्या स्वरावरून जाणवत होते की तो गाडीवरील ओरखड्यांमुळे खूश नाहीये. म्हणून त्याने त्याच्या धाकट्या भावाला रागाच्या स्वरात विचारले, हे काय आहे? या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसतंय की रोहित शर्मा त्याच्या आईचा हात धरून तिला गाडीत बसवतोय.
हेही वाचा – Rohit Sharma Stand : रोहित शर्माच्या नावाच्या स्टँडचं वानखेडे स्टेडियमवर भव्य अनावरण, पाहा VIDEO
या सोहळ्यात रोहित शर्मासह अजित वाडेकर आणि शरद पवार यांच्या नावाच्या स्टँड्सचे अनावरण झाले, तसेच एमसीए ऑफिस लाऊंजचे समर्पण अमोल काळे यांच्या स्मरणार्थ करण्यात आले. भारत-पाक तणावामुळे हा कार्यक्रम १३ मे रोजी होणार होता. मात्र, तो आज पार पाडला. यावेळी एमसीएच अध्यक्ष अजिंक्य नाईक आणि इतर मान्यवरही उपस्थित होते.





