रोहित राऊत ठरला ‘I Popstar’ चा विजेता; पत्नी जुईलीची खास पोस्ट

Juilee Joglekar Post | सोशल मीडियावर I-Popstar या सिंगिग रिअॅलिटी शोची चांगली चर्चा होती. यातील स्पर्धकांच्या गाण्याने रसिक प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले. या कार्यक्रमाचा मराठमोळा गायक रोहित राऊत विजेता झाला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यानंतर आता रोहितसाठी त्याची पत्नी जुईलीने सोशल मीडियावर त्याचे अभिनंदन करत एक पोस्ट शेअर केली आहे.
जुईलीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्या नवरोबाचं कौतुक करत म्हटलंय, “आज मला तुझा किती अभिमान वाटतोय हे मी शब्दातही सांगू शकत नाही. मी तुझा आय-पॉपस्टारचा संपूर्ण प्रवास पाहिला आहे. समर्पण, रात्र-रात्र जागणं, तु तू तुझ्यातील कौशल्यांना वाव दिला. ती प्रत्येक गोष्ट दिसून येत आहे आणि त्याचा खरोखरच फायदा झाला.”
View this post on Instagram
पुढे जुईने म्हटलं, “मला अजूनही आठवतंय फिनालेच्या शेवटच्या आठवड्यात तुझी बरीच गाणी नाकारली गेली होती. पण आज तुझा तो शेवटचा परफॉर्मन्स… खूपच कमाल! तू फक्त सादरीकरण केले नाहीस, तर त्या स्टेजवर तुझा ताबा होता. हा विजय खूप योग्य आहे आणि कायम आठवणीत राहणारा आहे. मी तुझा संघर्ष पाहिला आहे, तुझे कठोर परिश्रम पाहिले आहेत आणि आज तुझं यशही पाहते आहे. तुझा खूप अभिमान आहे. असाच पुढे जात राहा ही तर फक्त सुरुवात आहे.” अशी पोस्ट लिहून नवऱ्याचं यशाचा आनंद सेलिब्रेट केला आहे. Juilee Joglekar Post |
दरम्यान, १८ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या शोमध्ये किंग, आस्था गिल, आदित्य रिखारी आणि परमिश वर्मा हे गायक परिक्षकाच्या खुर्चीत बसलेले पाहायला मिळाले. विविध भाषांमध्ये गाणारे स्पर्धक या मंचावर सुंदर गाणी सादर केली. या कार्यक्रमातून मराठमोळा गायक रोहित राऊत पुन्हा एकदा रिअॅलिटी शो गाजवला आणि ट्रॉफी आपल्या नावावर केली. Juilee Joglekar Post |
हेही वाचा :
अभिनेता रणदीप हुड्डा ४९ व्या वर्षी होणार बाबा; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव



