“संजय राऊतांची प्रतिक्रिया आश्चर्यकारक…”; शरद पवारांवरील टीकेवर रोहित पवारांचे प्रत्युत्तर

Rohit Pawar | दिल्लीत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. मात्र, या पुरस्कारामुळे आता राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी यावरून नाराजी व्यक्ती केली. ज्या एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे सरकार पाडले, बेईमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होतं, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले. यावर आता रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
रोहित पवार यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले आहे की, “दिल्लीतील कार्यक्रमावरून संजय राऊत साहेबांसारख्या मोठ्या राजकीय नेत्याने दिलेली प्रतिक्रिया आश्चर्यकारक आहे. महाराष्ट्राला स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सुसंस्कृत राजकारणाची परंपरा लाभली असून स्व. बाळासाहेब ठाकरे, आदरणीय पवार साहेब यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी ही परंपरा पुढे नेली.” Rohit Pawar |
दिल्लीतील कार्यक्रमावरून संजय राऊत साहेबांसारख्या मोठ्या राजकीय नेत्याने दिलेली प्रतिक्रिया आश्चर्यकारक आहे. महाराष्ट्राला स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सुसंस्कृत राजकारणाची परंपरा लाभली असून स्व. बाळासाहेब ठाकरे, आदरणीय पवार साहेब यांच्यासारख्या जेष्ठ नेत्यांनी ही परंपरा पुढे…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 12, 2025
पुढे त्यांनी लिहिले की, सामाजिक-सांकृतिक कार्यक्रमांना राजकीय मतभेदाचा कधीही अडसर ठरू दिला नाही तसेच महाराष्ट्राची सामाजिक व सांकृतिक वीण अधिक घट्ट करण्यावर नेहमीच भर दिला. पण मागील दोन-तीन वर्षात भाजपाने कलुषित केलेले राजकारण, महाराष्ट्राच्या अस्मितेशी केलेली छेडछाड बघता यामुळेच संजय राऊत साहेबांनी तडकाफडकी ही प्रतिक्रिया दिली असावी,” असे म्हणत यावर भूमिका मांडली आहे. Rohit Pawar |
संजय राऊत काय म्हणाले होते?
‘आम्हाला दिल्लीतले राजकारण माहिती नाही आणि कळत नाही. पण आम्हालाही राजकारण कळतं. काही गोष्टी राजकारणात टाळायच्या असतात. महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्या, उद्योग पळवून नेणाऱ्या अमित शाहांचा सत्कार आहे. शिंदे हे अमित शाहांचे प्रतिक आहेत. महाराष्ट्र कमजोर केला त्यांना सन्मानित का करता?’ महाराष्ट्रातील लोकांसमोर आम्ही कोणत्या तोंडाने जाणार? राजकारणात कोण-कोणाचा शत्रू किंवा मित्र नसतो, हे ठीक आहे. पण ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली, ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो, त्यांना अशाप्रकारे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभीमानाला धक्का लावणारा आहे. ही आमच भावना आहे, कदाचित पवारांची भावना वेगळी असू शकेल. पण हे महाराष्ट्रातील जनतेला पटलेलं नाही,” असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.
हेही वाचा:





