अभिनेता रणदीप हुड्डा ४९ व्या वर्षी होणार बाबा; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

Randeep Hooda | बॉलीवूड अभिनेता रणदीप हुड्डा ४९ व्या वर्षी बाबा होणार आहे. रणदीप व लिन लैशराम लग्नानंतर दोन वर्षांनी त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहे. दोघांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत ही गुड न्यूज दिली आहे.
रणदीप व लिन यांनी जंगलात शेकोटीजवळ बसून काढलेला एक फोटो पोस्ट केला. ‘प्रेम व साहसाची दोन वर्षे आणि आता लवकरच एक चिमुकला सदस्य आयुष्यात येणार आहे,’ अशा आशयाचं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं आहे. रणदीप व लिन यांनी ही आनंदाची बातमी शेअर केल्यानंतर चाहते त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. दोघांनाही आई-बाबा म्हणून लवकरच सुरू होणाऱ्या या नवीन प्रवासासाठी चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
रणदीप व लिन यांनी काही वर्षे एकमेकांना डेट केलं. नंतर त्यांनी मणिपूरमधील इंफाळ येथे कुटुंबीय जवळचे नातेवाईक मित्रपरिवाराच्या उपस्थितीत २९ नोव्हेंबर २०२३ रोजी लग्न केलं होतं. लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवशी आयुष्यात तिसऱ्या सदस्याचं आगमन होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. Randeep Hooda |
कोण आहे लिन लैशराम?
रणदीप हुड्डाची पत्नी लिन लैशराम ही मणिपूरची रहिवासी आहे आणि ती व्यवसायाने भारतीय मॉडेल आणि अभिनेत्री आहे. रणदीपची बायको ही त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. रणदीप हुड्डाने 2021 साली लिनच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या नात्याची घोषणा केली होती. Randeep Hooda |
हेही वाचा:
सूर्याची किरणे ठरली विमान वाहतूक विस्कळीत होण्याचे कारण? भारतात अनेक उड्डाणांवर परिणाम





